का आली रणवीर सिंगवर मुलींसारखी कपडे घालण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:37 IST2016-12-18T19:35:21+5:302016-12-19T10:37:43+5:30
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आपल्या फॅशनेबल कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. प्रत्येकवेळी काहीतरी नवे परिधान करण्याचा त्याचा बेत असतो. त्याने ...
.jpeg)
का आली रणवीर सिंगवर मुलींसारखी कपडे घालण्याची वेळ?
रणवीर नुकताच एका ठिकाणी अजब ड्रेस घालून दिसला होता. पापाराझींनी त्याच्या ड्रेसचा फोटो शेअर केल्यावर, मात्र सोशल मीडियावर रणवीरच्या ड्रेसबाबत कमेंट करण्यात आली. अजब स्टाईल असलेला ड्रेस घालून असलेला फोटो ट्विटर चांगलाच व्हायरल झाला. त्याच्या या फोटोवर यूजर्स व फॉलोअर्सनी चांगलेच कमेंट केले आहेत.
रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेला आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ हा चित्रपट गत आठवड्यात प्रदर्शित झाला होता. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने ५० कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट सुपरहिट नसला तरी देखील हिट ठरेल असे मानले जाते. दरम्यान दुसऱ्या आठवड्यात बॉक्स आॅफिसवर ‘बेफिक्रे’ला पसंती देतील असा अंदाज लावला जात आहे.
यासोबतच संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ मध्ये तो दीपिका पादुकोण, शाहिद कपूर सोबत दिसेल. यासाठी तो चांगलीच मेहनत घेत आहेत. ‘पद्मावती’मधील त्याची भूमिका आतापर्यंतचा सर्वांत चॅलेंजिग असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. पद्मावतीमध्ये रणवीर अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे.