मंदना करिमी इतकी का झाली लग्नासाठी उतावीळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:22 IST2016-12-16T14:22:52+5:302016-12-16T14:22:52+5:30
‘बिग बॉस’च्या ९व्या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री मंदना करिमी अनेक स्वप्नं घेऊन बॉलिवूडमध्ये आली होती. एक मोठी अभिनेत्री बनण्याचे तिचे ...

मंदना करिमी इतकी का झाली लग्नासाठी उतावीळ?
‘ िग बॉस’च्या ९व्या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री मंदना करिमी अनेक स्वप्नं घेऊन बॉलिवूडमध्ये आली होती. एक मोठी अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते. याच स्वप्नपूर्तीसाठी इराण सोडून तिने मायानगरी गाठली होती. पण कदाचित आता तिचा इरादा बदलेला दिसतोय. होय, करिअर सोडून मंदाना लग्नासाठी जाम उतावीळ झालीयं. नव्या वर्षांत मंगेतर गौरव गुप्ता याच्यासोबत मंदना लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. अतिशय जवळच्या आप्तेष्ठांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
मंदनाचे याचवर्षी जुलै महिन्यात गौरवसोबत साखरपुडा केला होता. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. खुद्द मंदनाने एका मुलाखतीत याचे संकेत दिले. करिअरपेक्षा माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचे आहेत, असे ती म्हणाली. माझ्याकडे चित्रपटांच्या अनेक आॅफर्स येत आहेत. मात्र कुटुंब आणि लग्न याला मी प्राधान्य देईल, असेही तिने स्पष्ट केले.
![]()
अनेक चित्रपटांत आयटम साँग आणि लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर मंदना यावर्षी आलेल्या ‘क्या कुल है हम3’मध्ये पहिल्यांदा फीमेल लीड रोलमध्ये दिसली होती. म्हणजेच आत्ता कुठे तिच्या करिअरने झेप घेतली होती. पण अचानक करिअला करकचून ब्रेक लावत मंदनाने लग्नाचा निर्णय घेतला. ही मोठी रिस्क नाही का? असा प्रश्न मंदनाला केला गेला. मात्र मंदना तिच्या निर्णयावर ठाम दिसली. मला अनेकांनी लग्नाचा निर्णय ही तूर्तास मोठी रिस्क ठरेल, असे सांगितलेयं. पण माझ्यामते, लग्नासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. करिअरसाठी मी माझे कौटुंबिक आयुष्य पणाला लावू शकत नाही. शेवटी कुटुंबासोबतच यशाचा आनंद साजरा करण्यात खरी मजा आहे, असे ती म्हणाली.
लग्नानंतर मी अगदी निवडक चित्रपटांत काम करेल,हा मंदनाचा निर्धारही पक्का आहे. आता मंदना इतकी ठाम आहे म्हटल्यावर लग्नाच्या निर्णयापासून तिला कोण परावृत्त करू शकणार? होय ना? तेव्हा लग्नासाठी तिला शुभेच्छा देऊ यात!!