मीडियाचे कॅमेरे बघताच अर्जुन कपूरने लपवला चेहरा, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 11:02 IST2018-11-20T10:59:14+5:302018-11-20T11:02:01+5:30
बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय.

मीडियाचे कॅमेरे बघताच अर्जुन कपूरने लपवला चेहरा, पण का?
बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. होय, काल-परवा अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकरच्या आॅफिसबाहेर दिसला. पण यावेळी रेड हुडी आणि ब्लॅक चष्मा घातलेल्या अर्जुनला ओळखणे कठीण होते. मीडियाला पाहताच त्याने आपला अख्खा चेहरा झाकून घेतला. आता असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मलायकासोबत डेटवर जाण्यासाठी अर्जुनने हा सगळा खटाटोप केला असावा, असेही तुम्हाला वाटेल. पण असे नाहीय.
होय, अर्जुनच्या चेहरा लपवण्यामागचे कारण आहे, त्याचे नवे लूक़ होय, आपल्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चे शूटींग पूर्ण केल्यानंतर अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकरणच्या ‘पानीपत’ या चित्रपटात दिसणार आहे.
यात अर्जुनचे लूक एकदम वेगळे असणार आहे. या चित्रपटासाठी अर्जुन मुंडण करणार असल्याचेही कळतेय. हे लूक लपवण्याचा निर्णय ‘पानीपत’च्या मेकर्सनी घेतला आहे. आता फक्त अर्जुन हे लूक कधीपर्यंत लपवतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
‘पानीपत’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तूर्तास अर्जुन कपूर त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या मलायका अरोराच्या प्रेमात वेडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. कालपरवा महीप कपूरने मलायका व अर्जुनचा एका पार्टीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत मलायका अर्जुनला अगदी बिलगुन बसलेली दिसली होती.