​अनिल कपूर मुलासोबत का दिसत नाहीत??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 16:52 IST2016-06-20T11:22:59+5:302016-06-20T16:52:59+5:30

गत चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करणारे अनिल कपूर यांनी एकापेक्षा एक असे हिट चित्रपट दिलेत. त्यांच्या अभिनयाने अनेकांना वेड ...

Why does not Anil Kapoor see with his son? | ​अनिल कपूर मुलासोबत का दिसत नाहीत??

​अनिल कपूर मुलासोबत का दिसत नाहीत??

चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करणारे अनिल कपूर यांनी एकापेक्षा एक असे हिट चित्रपट दिलेत. त्यांच्या अभिनयाने अनेकांना वेड लावले. पण अनिल कपूर यांच्या स्वत:च्या मुलांना मात्र त्यांचे चित्रपट फारसे आवडत नाहीत. अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर हिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लहान मुलगी रिया निर्माता बनली आहे आणि आता मुलगा हर्षवर्धन हा ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्जा’मधून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. अनिल कपूर अनेकदा सोनम कपूरसोबत दिसतात. पण हर्षवर्धनसोबत ते कदाचितच दिसले असतील. यामागचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. पण अनिल यांनी स्वत:च या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अनिल यांनी सांगितले की,अनेकांना मला एक मुलगाही आहे, हेच ठाऊक नाही. मला केवळ दोन मुली आहे, असेच त्यांना वाटते. मी माझ्या मुलाबाबत फारसे कुणाशी बोलत नाही. पार्टीमध्येही त्याला सोबत घेऊन जात नाही. माझे असे वागणे त्याच्या फायद्याचे आहे, असे मला वाटते. कारण यामुळे तो स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू शकेल, असे मला वाटते.

Web Title: Why does not Anil Kapoor see with his son?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.