सनी देओलने लपवले होते मीडियापासून लग्न, अशाप्रकारे कळले सगळ्यांना लग्नाविषयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:41 IST2020-12-25T17:36:20+5:302020-12-25T17:41:39+5:30
सनी आणि पूजा यांचे लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आले होते.

सनी देओलने लपवले होते मीडियापासून लग्न, अशाप्रकारे कळले सगळ्यांना लग्नाविषयी
अनेक अभिनेत्यांच्या पत्नी नेहमीच आपल्या पतीसोबत सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावत असतात. पण अभिनेता सनी देओलची पत्नी आपल्याला कधीच कोणत्या कार्यक्रमात त्याच्यासोबत पाहायला मिळत नाही. तसेच कधीच प्रसारमाध्यमांमध्ये तिचा फोटो दिसून येत नाही. पण सनी देओलची पत्नी ही लाईमलाईटपासून दूर राहाणेच पसंत करते.
सनी देओलने काही महिन्यांपूर्वी करण देओल या त्याच्या मुलाला पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे लाँच केले. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आणि करणने मीडियाला मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतींच्यावेळी करणसोबत त्याची आई उपस्थित होती. सनी देओलची पत्नी ही दिसायला खूपच सुंदर असून एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसते. सनीच्या पत्नीचे नाव पूजा असून १९८४ मध्ये त्या दोघांचे लग्न झाले.
सनीला आपल्या खाजगी आयुष्याची मीडियात चर्चा झालेली आवडत नाही. त्यामुळे त्याने लग्न झाल्याची बातमी देखील मीडियापासून लपवून ठेवली होती. सनीने बेताब या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर अनेकवेळा तो पूजाला भेटायला लंडनला जात असे. सनी आणि पूजा यांचे लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आले होते. पुढे सनीच्या लग्नाचे फोटो युकेच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेत आणि या लग्नाबद्दल जगाला कळले. अर्थात यानंतरही आजपर्यंत कधीच सनी आणि पूजा यांना पब्लिकली एकत्र पाहिले गेले नाही.
सनी कधीच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पोस्ट करत नाही. पण सनीचा मुलगा करण याने काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.सनी आणि पूजा यांना करण, राजवीर अशी दोन मुले आहेत.