​या बॉलिवूड अभिनेत्याने का लपविली आपल्या लग्नाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 18:13 IST2017-02-05T12:43:19+5:302017-02-05T18:13:19+5:30

रमैय्या वस्तावैया या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारा अभिनेता गिरीश तौरानी याने आपल्या आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. ...

Why is this Bollywood actor hiding his wedding news! | ​या बॉलिवूड अभिनेत्याने का लपविली आपल्या लग्नाची बातमी!

​या बॉलिवूड अभिनेत्याने का लपविली आपल्या लग्नाची बातमी!

ैय्या वस्तावैया या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारा अभिनेता गिरीश तौरानी याने आपल्या आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. गिरीशचे विवाहित असून त्याने एका वर्षापूर्वी आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केले. मात्र त्याने ही गोष्ट का लपविली याचा खुलासा करीत त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गिरीशने लवशुदा या चित्रपटातही भूमिका के ली आहे. मात्र त्याचे आयुष्य खरोखरच लवशुदा ठरले असल्याचे दिसते. 



गिरीश तौरानी म्हणाला, मी ही गोष्ट यासाठी कुणाला सांगितली नाही कारण याचा परिणाम माझ्या प्रोफेशनल करिअरवर पडला असता याची मला भिती वाटत होती. मात्र आता ही भिती माझ्या मनातून निघाली आहे. गिरीशने त्याच्या लहाणपनीच्या मैत्रिणीसोबत विवाह केला आहे. आपल्या लग्नाबद्दल गिरीश म्हणाला, मी मागील वर्षी माझी गर्लफ्रेण्ड कृष्णा मंगवानी हिच्याशी विवाह केला. आम्ही दोघेही क्लासमेट्स होतो आणि २००७ पासून आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आमची लव्ह लाईफ  बरीच मोठी होती. अखेर या दीर्घ रिलेशनशीपचा अंत आम्ही लग्न करून केला. कृष्णाने माझे कमिटमेंट्स आणि चित्रपटाबद्दलची असलेली सेफ्टी तिने समजून घेतली आहे. मात्र आता मी तिला सर्वांसमोर आणायलाच हवे. 



गिरीश तौरानी आणि कृष्णा मंगतानी यांनी मागील वर्षी जोधपूरमध्ये लग्न केले होते. धूमधडाक्यात साजारा झालेला त्याचा विवाह सिंधी पद्धतीने झाला होता. दोघेही लग्नानंतर हनीमूनसाठी युरोपात गेले होते. विशेष म्हणजे या लग्नासाठी गिरीशने जबरदस्त तयारी केली होती, कृष्णासाठी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लहेंगा घातला होता. हा लग्नाचा लहेंगा १४ किलोचा होता. यात कृष्णा खूपच सुंदर दिसत होती. 


Web Title: Why is this Bollywood actor hiding his wedding news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.