करणच्या शोमध्ये दीपिकासोबत येणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:17 IST2016-11-25T16:17:44+5:302016-11-25T16:17:44+5:30
करण जोहर होस्ट करीत असलेला ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो सध्या चर्चेत आहे. करणचे काहीसे बोल्ड अन् काहीसे ...

करणच्या शोमध्ये दीपिकासोबत येणार कोण?
क ण जोहर होस्ट करीत असलेला ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो सध्या चर्चेत आहे. करणचे काहीसे बोल्ड अन् काहीसे गमतीशीर प्रश्न अनेकदा या शोवर येणा-या सेलिब्रिटींची बोलती बंद करतात. कधीकधी मात्र सेलिब्रिटीच करणवर बूमरँग होत, त्याची गुगली करून टाकतात. सध्या प्रचंड लोकप्रीय असलेल्या या चॅट शोवर आता एक आगळीवेगळी सेलिब्रिटी जोडी येणार असल्याची खबर आहे. ही जोडी म्हणजे दीपिका पादुकोण आणि तिच्या आगामी हॉलिवूड मुव्हीमधला तिचा को-स्टार विन डिजेल. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका विनसोबत करणच्या या शोमध्ये हजेरी लावू शकते. दीपिका लवकरच विनसोबत ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ दी झेंडर केज’ या हॉलिवूडपटात झळकणार आहे. येत्या जानेवारीत हा चित्रपट भारतासह जगभर रिलीज होतो आहे. साहजिकच या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून हॉलिवूड स्टार विन डिजेलला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विन ‘ट्रिपल एक्स’च्या भारतात आलाच तर प्रमोशनसाठी ‘कॉफी विद करण’सारखे दुसरे व्यासपीठ नाहीच. त्याचमुळे दीपिका व विन करणच्या या शोमध्ये येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. दीपिकाचा बॉयफ्रेन्ड रणवीर सिंह याने आधीच रणबीर कपूरसोबत या शोमध्ये हजेरी लावलीय. या दोघांच्या ‘कॉफी विद करण’मधील एपिसोडची चांगलीच चर्चा झाली होती. आता दीपिका व विन या दोघांची चर्चा आहे. हे दोघे ‘कॉफी विद करण’मध्ये आलेच तर काय होईल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. धम्माल मस्ती आणि मस्ती...दुसरे काय... होय ना?
दीपिका पादुकोण सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
दीपिका पादुकोण सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.