​‘हसीना’ला कुण्या पोलिस अधिका-याची करायची होती बदली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:05 IST2017-10-02T10:35:38+5:302017-10-02T16:05:38+5:30

अलीकडेच ‘हसीना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा ...

Who was the key police officer to change Hasina? | ​‘हसीना’ला कुण्या पोलिस अधिका-याची करायची होती बदली?

​‘हसीना’ला कुण्या पोलिस अधिका-याची करायची होती बदली?

ीकडेच ‘हसीना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण पडद्यावर हसीनाचे पात्र साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची मात्र जोरदार प्रशंसा झाली. 
आज हसीना पारकर हयात नाही. पण दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी तिच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हसीना जिवंत होती. हसीनाला या चित्रपटासाठी राजी करणे सोपे नव्हते. अपूर्व लखिया यांना यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मला माझे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणायचे नाही, असे सांगून खुद्द हसीनाने अपूर्व यांना फटकारले देखील. पण अपूर्वने हसीना तिच्या आयुष्यावरील चित्रपटासाठी कसेबसे राजी गेले. पुढे अपूर्व लखिया हसीना व तिच्या कुुंटुंबाला सुमारे दीड वर्षे भेटत राहिले. हसीनाची केस हाताळणा-या पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनाही लखिया भेटले. आता हा सगळा ‘इतिहास’ सांगण्याचे कारण म्हणजे, मीरा बोरवणकर यांची मुलाखत.

ज्या मीरा बोरवणकर यांनी ‘हसीना’ चित्रपटासाठी काही महत्त्वपूर्ण संदर्भ पुरवले होते, त्याच मीरा बोरवणकर हसीनाला नकोशा झाल्या होत्या. मीरा बोरवणकर यांची कधी एकदा बदली होते, यासाठी हसीना प्रयत्न करत होती. खुद्द मीरा बोरवणकर यांनीच हा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, मी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये असताना हसीना दाऊदच्या नावाखाली खंडणी वसूल करण्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमच्याकडे माहिती होती पण तशी तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नव्हते. एकदिवस एक अधिकारी माझ्याजवळ आला अन् हसीनाच्याविरोधात तक्रार आली असल्याचे त्याने मला सांगितले. पण आम्ही एफआयआर दाखल केल्यावर तक्रार करणारी ती महिला अचानक बेपत्ता झाली. आमची टीम तिच्या मागावर असताना एक दिवस काही अधिकारी एक रेकॉर्डिंग घेऊन माझ्याकडे आलेत. ते रेकॉर्डिंग हसीनाचे होते. ‘ऐसा करो, एक स्पेशल नमाज करावो. ये मीरा बोरवणकर की यहां से बदली कराओ,’ असे हसीना कुणाला तरी या रेकॉर्डिंगमध्ये सांगत होती.

ALSO READ : श्रद्धाशिवाय दुसरे काहीच नाही!
 

Web Title: Who was the key police officer to change Hasina?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.