​उर्मिलाचा पती आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 06:22 IST2016-03-04T13:22:31+5:302016-03-04T06:22:31+5:30

बॉलिवूडची मराठमोठी ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकर ही गुरुवारी बोहल्यावर चढली. तिच्या लग्नाची बातमी हा तिच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे गोड धक्का ...

Who is Urmila's husband? | ​उर्मिलाचा पती आहे तरी कोण?

​उर्मिलाचा पती आहे तरी कोण?

लिवूडची मराठमोठी ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकर ही गुरुवारी बोहल्यावर चढली. तिच्या लग्नाची बातमी हा तिच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे गोड धक्का होता. कधी ना प्रेमात पडल्याची चर्चा, ना कधी डेटींगची बातमी! असे असताना उर्मिलाचे लग्न माध्यमांसाठीही ब्रेकींग न्यूज ठरले. काश्मिीरमधील उद्योगपती मोहसिन अख्तर मीर या काश्मीर उद्योगपतीशी उर्मिलाने विवाह केला. उर्मिलाचा विवाह होण्यापूर्वी मोहसिनचे नावही कुणी फारसे ऐकलेले नव्हते. त्यामुळेच हा मोहसिन कोण, कुठला, काय करतो असे अनेक प्रश्न उर्मिलाच्या चाहत्यांना भेडसावू लागले आहेत. तेव्हा डोक्याला फार ताण देऊ नका. कारण मोहसिन हा कोण आहे, हे आम्हीच तुम्हाला सांगतो आहोत.



उर्मिलाचा पती मोहसिन हा काश्मीरातील उद्योगपती आहे. त्याचा गारमेंट्सचा व्यवसाय आहे.उर्मिलाहून तो जवळपास दहा वर्षांनी लहान आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानेच सर्वप्रथम उर्मिला आणि मोहसिनची भेट घडवून दिली होती. या पहिल्या भेटीतच उर्मिला व मोहसिन यांच्यात नजरा नजर झाली. कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यासोबतच मोहसिन मॉडेलही आहे. मोहसिनने जोया अख्तर हिच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात एक भूमिका साकारली होती.‘मुंबई मस्त कलंदर’ यातही तो दिसला होता. ‘इटस अ मॅन्स वर्ल्ड’ हा त्याचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ए. आर. रहमान याच्या ‘ताजमहाल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसिन झळकला होता. विशेष म्हणजे २००७ मध्ये मिस्टर इंडिया कॉन्टेस्टमध्ये तो सेकंद रनर अप राहिला होता.

Web Title: Who is Urmila's husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.