​ट्विकंल म्हणते कोण अक्षय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:00 IST2016-02-26T15:00:13+5:302016-02-26T08:00:13+5:30

खिलाडी कुमारची पत्नी आणि पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्रा सध्या लेखक व इंटेरिअर डिझायनर म्हणून अधिक चर्चेत आहे. ट्विटरवर मेजशीर पण ...

Who says Twinkle? | ​ट्विकंल म्हणते कोण अक्षय?

​ट्विकंल म्हणते कोण अक्षय?

लाडी कुमारची पत्नी आणि पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्रा सध्या लेखक व इंटेरिअर डिझायनर म्हणून अधिक चर्चेत आहे. ट्विटरवर मेजशीर पण बोचरी टीका करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. 

नुकतेच एका पुस्तक  प्रकाशन कार्यक्रमात जेव्हा तिला विचारण्यात आले की, अक्षयकुमार रोमँटिक आहे की नाही. त्यावर मॅडमने ताडकन उत्तर दिले, अक्षय? कोण अक्षय? मी कोण्या अक्षयला ओळखत नाही धन्यवाद!

‘बिर्इंग सायरस’ आणि ‘फार्इंडिंग फॅनी’ चित्रपटाची लेखिका केसरी खंबट्टा लिखित ‘द व्हिलेज आॅफ पॉर्इंटलेस कॉनव्हरसेशन’ या पुस्तकाच्या लाँचिंगप्रसंगी ती बोलत होती.

ती म्हणाली की, मी रोमँटिक व्यक्ती आहे. मात्र, व्यावहारिकसुद्धा आहे. आपला फायदा घेणारे, लुबाडणारे अनेक लोक सतत अवतीभवती असतात. त्यांच्यापासून वाचून राहणे गरजेचे असते.

Twinkle

पुस्तकाची स्तुती करताना ट्विंकल म्हणाली की, ‘लि हार्पर यांच्या ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ पुस्तकाने जसा माझ्यावर परिणाम केला होता अगदी तसाच परिणाम केसरीच्या या पुस्तकाने केला. तिच्या लेखणीने मी फार प्रभावित झाले. एवढे की, मी सध्या लिहित असलेले पुस्तक फाडून फेकून देण्याची इच्छा झाली.’

Web Title: Who says Twinkle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.