​रणवीर सिंगची ‘कार्बन कॉपी’ आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 19:02 IST2017-01-22T13:27:29+5:302017-01-22T19:02:02+5:30

हमद केवळ रणवीर सारखा दिसतो असे नव्हे तर तो चांगला डान्सरही आहे. त्याने आपल्या डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Who is Ranvir Singh's carbon copy? | ​रणवीर सिंगची ‘कार्बन कॉपी’ आहे तरी कोण?

​रणवीर सिंगची ‘कार्बन कॉपी’ आहे तरी कोण?

गील वर्षी पाकिस्तानी चायवाला सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरला होता. त्याच्या मागे कित्येक मुली वेड्या झाल्या होत्या. भारतातही अशा देखण्या चेहºया मागे लागणाºया मुली कमी नाहीत. असाच एक बॉलिवूडचा चेहरा म्हणजे रणवीर सिंग. त्याच्या सोशल मीडियावर अनेक मुली फॉलोअर्स आहेत. मात्र सध्या रणवीर सिंग ऐवजी एका व्यक्तीला मुलीला फॉलो करीत आहेत. आश्चर्य वाटलं ना! कुणी सेलिब्रेटी नाही तर तो रणवीर सारखा दिसणारा एका पाकिस्तानी व्यावसायिक आहे. त्याला आपण रणवीरचा जुळा भाऊ म्हणू शकतो. 

पाकिस्तानातील हा रणवीर सिंग सारखा दिसणारा व्यक्ती म्हणजे हमद शोएब. हमद याला रणवीर सिंगची कार्बन कॉपी म्हणता येईल. हमद शोएब हा एक व्यावसायिक असून तो गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील वृत्तपत्रांमध्ये व सोशल मिडीया चर्चेत आला आहे. पाकिस्तानातील एका ब्लॉगरने तर हमदला रणवीर म्हणून संबोधल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आला असून त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. हमद इन्स्टाग्राम या सोशल फोटो नेटवर्कि ंग साईटवर चांगलाच अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याचे पोस्ट करण्यात आलेले फोटो पाहून हे रणवीरचे फोटो आहेत की हमदचे असा प्रश्न पडू शकतो. Read More : It's amazing :पाहा, रणवीर सिंहचा ‘पद्मावती’ अवतार !!

 



हमद केवळ रणवीर सारखा दिसतो असे नव्हे तर तो चांगला डान्सरही आहे. त्याने आपल्या डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या डान्स करण्याची स्टाईल हुबेहुब रणवीर सिंग सारखीच आहे. मात्र हमद आपण रणवीर सिंग सारखे दिसतो असे मान्य करीत नाही. हमद म्हणतो, मी रणवीर सारखा अजिबात दिसत नाही, पण लोकांना जर मी रणवीर सिंग सारखा दिसत असल्याचे वाटत असेल तर हे माझे भाग्य आहे. 
पाकिस्तानी चायवाला आता मॉडेल झाला आहे, यानंतर हमदही याच मार्गावर जातो काय हे पाहणे उत्सुकता वाढविणारे आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंग आपल्या कार्बन कॉपीबद्दल काय प्रतिक्रिया देतो याचा जरा अंदाज लावून बघा. Read More : आमिर खान म्हणाला, रणवीर सिंगला विचारणार की, सेक्सपूर्वी तो कुठले औषध खातो?

 

 
ALSO READ 
रणवीर-दीपिकाने लपवले, ते विन डिझेलने सांगून टाकले!
Alia Bhatt : Cocaine, Kangana Ranaut : Afeem, Katrina Kaif : Smack ; अंडरवर्ल्डमध्ये मादक द्रव्यांच्या व्यापारासाठी बॉलिवूड कलावंताच्या नावाचा वापर

Web Title: Who is Ranvir Singh's carbon copy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.