मध्यरात्री तातडीने रुग्णालयात येऊन सैफ अली खानचे ऑपरेशन करणारे डॉ. नितीन डांगे कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:51 IST2025-01-16T10:50:54+5:302025-01-16T10:51:45+5:30

Saif Ali Khan Attacked Updates : सैफ अली खानला मध्यरात्री ३.३० वाजता रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं

Who is Dr. Nitin Dange who came to the Lilavati Hospital urgently at midnight and operated on Saif Ali Khan know more details | मध्यरात्री तातडीने रुग्णालयात येऊन सैफ अली खानचे ऑपरेशन करणारे डॉ. नितीन डांगे कोण? जाणून घ्या

मध्यरात्री तातडीने रुग्णालयात येऊन सैफ अली खानचे ऑपरेशन करणारे डॉ. नितीन डांगे कोण? जाणून घ्या

Saif Ali Khan Attacked Updates : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला. मुंबईतील वांद्रे परिसरात त्याच्या राहत्या घरी एका चोराने चाकूने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात सैफ बराच जखमी झाला. मध्यरात्री २ नंतर ही घटना घडली. चोराने त्याच्यावर ३ वार केले असल्याने सैफच्या शरीरातून बरंच रक्त वाहून गेलं होतं. त्याला तातडीने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर मध्यरात्री उपचार करण्यात आले. सैफच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका व्यक्तीशी सैफची झटापट झाली. सुदैवाने सैफला वेळीच रुग्णालयात उपचार मिळाल्याने तो 'आऊट ऑफ डेंजर' असल्याचे सांगण्यात आले आहे. या साऱ्या घटनेत मध्यरात्री डॉ. नितीन डांगे (Dr Nitin Dange) आणि त्यांच्या टीमने अतिशय वेगवान पद्धतीने धावपळ करत सैफवर शस्त्रक्रिया केली. जाणून घेऊया त्याबद्दल...

सैफवर उपचार करणाऱ्या टीममध्ये कोण-कोण?

लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्यावर त्याला मध्यरात्री साडेतीन वाजता रुग्णालयात आणण्यात आले. सैफ वर सहा वेळा चाकूने वार करण्यात आला होता. या सहा घावांपैकी दोन घाव खूपच खोलवर गेले होते. त्यातील एक घाव पाठीवर करण्यात आला असून तो मणक्याच्या अगदी जवळ होता त्यामुळे त्याच्यावर झटपट उपचार करणे गरजेचे होते. अशावेळी न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखाली कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन आणि अनेस्थेशिओलॉजिस्ट डॉक्टर निशा गांधी यांच्या टीमने सैफ वर उपचार केले.

कोण आहेत डॉ. नितीन डांगे?

लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वेबसाइटनुसार, डॉ. नितीन डांगे हे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईशी संबंधित जागतिक स्तरावर प्रसिद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक अँड एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन आहेत. त्यांना २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांची गणना सर्वात वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन आणि स्ट्रोक तज्ञांमध्ये केली जाते. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अनेक पदव्या आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळवली - एमएस, एमसीएच, ओबीएनआय (यूएसए), एफएफएचयू (जपान). एंडोव्हस्कुलर (इंटरव्हेंशनल न्यूरोसर्जरी), कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूरोसर्जरी, एन्युरिझम्स न्यूरोसर्जरी म्हणजेच कॉइलिंग आणि क्लिपिंग, आर्टेरिओव्हेबस मॅलफॉर्मेशन (एव्हीएम) म्हणजेच एम्बोलायझेशन आणि सर्जरी याबाबत त्यांचा सखोल अभ्यास आहे. ब्रेन हॅमरेज सर्जरी, स्कल बेस सर्जरी, मिनिमली इनव्हेसिव्ह न्यूरोसर्जरी, न्यूरोट्रॉमा आणि हेड इंज्युरी सर्जरी, स्पाइन सर्जरी, पेडियाट्रिक न्यूरोसर्जरी, नेव्हिगेशन गाईडेड सर्जरी, ब्रेन ट्यूमर मॅनेजमेंट, स्टेरोटॅटिक न्यूरोसर्जरी यात ते निष्णात आहेत.

Web Title: Who is Dr. Nitin Dange who came to the Lilavati Hospital urgently at midnight and operated on Saif Ali Khan know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.