कोण आहे अलाना पांडे? गँगरेपच्या धमकीमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 10:27 AM2020-06-12T10:27:09+5:302020-06-12T10:27:18+5:30

बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अलाना तितकीच हुशारही आहे. गेल्या काही दिवसांपासून ती खूप चर्चेत आहे. अलाना पांडे ...

Who is Alana Pandey ? Recently She Receives Rape Threat From A Woman Over Bikini Pic | कोण आहे अलाना पांडे? गँगरेपच्या धमकीमुळे आली होती चर्चेत

कोण आहे अलाना पांडे? गँगरेपच्या धमकीमुळे आली होती चर्चेत

googlenewsNext

बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अलाना तितकीच हुशारही आहे. गेल्या काही दिवसांपासून ती खूप चर्चेत आहे. अलाना पांडे ही  बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे याची पुतणी आहे. तर अभिनेत्री अनन्या पांडे हिची अलाना ही चुलत बहीण आहे. बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू हिची मैत्रीण आणि फिटनेस तज्ञ डियाना पांडे हिची अलाना ही लेक आहे. 

अलाना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत अलाना चर्चेत असते. मध्यंतरी बॉयफ्रेंड यूडी जयसिंहसोबत अलाना मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तिथलेच काही हॉट आणि बोल्ड फोटो  अलानाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अलाना आणि यूडी गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असलेली अलाना लवकरच रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार असल्याचे बोललं जात आहे. अलानाच्या हॉट आणि सेक्सी फोटोंवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव सुरू असतो. याशिवाय स्वतःचे सेक्सी व्हिडिओ शेअर करून अलाना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. 

अलाना पांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही बिकिनी फोटो शेअर केले होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, या फोटोवरुन तिला एका महिला युजरनं गँगरेपची धमकी दिली होती.

हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा खुद्द अलानानं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर ही गंभीर बाब उघडकीस आणले होते.

Web Title: Who is Alana Pandey ? Recently She Receives Rape Threat From A Woman Over Bikini Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.