तुमचे आवडते स्टार्स कुठे करणार नववर्षाचे स्वागत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:34 AM2018-12-31T11:34:06+5:302018-12-31T11:39:24+5:30

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड सज्ज आहे. अख्ख्या बॉलिवूडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनचा उत्साह आहे. अनेक बॉलिवूडस्टार न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत. याच ठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत.

where your favourite celebs are vacationing on new year | तुमचे आवडते स्टार्स कुठे करणार नववर्षाचे स्वागत?

तुमचे आवडते स्टार्स कुठे करणार नववर्षाचे स्वागत?

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड सज्ज आहे. अख्ख्या बॉलिवूडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनचा उत्साह आहे. अनेक बॉलिवूडस्टार न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत. याच ठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत.  करिना कपूर, सैफ अली खान आपला लाडका मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये नववर्षाचे स्वागत करणार आहेत.  

लंडन हे न्यू ईअर सेलिब्रेशन करणाºयांसाठी हॉटस्पॉट आहे. पतौडी फॅमिली लंडनमध्येचं न्यू ईअरचे सेलिब्रेशन करणार आहे. करिना, सैफ, तैमूरसोबत नताशा पूनावाला ही देखील लंडनमध्ये आहे. नताशाने बेबो, सैफ व तैमूरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 


पतौडी फॅमिलीशिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर लंडनमध्ये आहे. 

राजकुमार राव यानेही गर्लफ्रेन्ड पत्रलेखासोबत लंडनमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनचा प्लान केला आहे.

जान्हवी कपूर, खूशी कपूर, अंशुला, अर्जुन कपूर हे सगळे पिता बोनी कपूर यांच्यासोबत सिंगापूरमध्ये नववर्षाचे स्वागत करणार आहेत.

सोनम कपूर, आनंद अहुजा हे कपल बाली येथे सुट्टी घालवत आहेत. या ठिकाणी हे कपल नववर्षाचे स्वागत करणार आहे.

प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांनी सर्वप्रथम अमेरिकेत कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. यानंतर ते लंडनमध्ये पोहोचले आणि तिथून स्वित्झर्लंडमध्ये. याचठिकाणी हे दोघे नववर्षाचे सेलिबे्रशन करणार आहेत.

अजय देवगण व काजोल मुलगा युग व मुलगी न्यासासोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करताहेत. याचठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत.

टायगर श्रॉफ व त्याची गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी हे दोघे एका अज्ञात स्थळी सुट्टी एन्जॉय करत आहेत. याचठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत.

Web Title: where your favourite celebs are vacationing on new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.