भारतात रावणाचं मंदिर कुठे आहे? आशुतोष राणाला विचारला प्रश्न, दिलं सुंदर उत्तर, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:50 IST2025-10-06T10:49:30+5:302025-10-06T10:50:42+5:30
Ashutosh Rana : बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांनी अलीकडेच आपल्या सखोल विचार आणि ज्ञानाची ओळख करून दिली.

भारतात रावणाचं मंदिर कुठे आहे? आशुतोष राणाला विचारला प्रश्न, दिलं सुंदर उत्तर, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी अलीकडेच आपल्या सखोल विचार आणि ज्ञानाची ओळख करून दिली. त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा रावणाची भूमिका साकारली आहे, तर काहीवेळा प्रभू रामाचीही भूमिका केली आहे. अशात एका कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने आशुतोष राणा यांना विचारलं की, “तुम्हाला माहीत आहे का, संपूर्ण भारतात रावणाचं मंदिर कुठे आहे?” या प्रश्नाचं उत्तर आशुतोष राणा यांनी खूप सुंदरपद्धतीने दिलं.
साध्या लोकांसारखं एखाद्या सामान्य उत्तराची अपेक्षा होती, पण आशुतोष राणा यांनी असं उत्तर दिलं की सर्वांचं मन जिंकलं. ते म्हणाले, "मी तर हे मानून चालतो की एक काळ होता - सत्ययुग. त्या वेळी देव वेगळ्या लोकांत राहत होते आणि दानव वेगळ्या लोकांत. मग आलं त्रेतायुग, ज्याची कथा आम्ही सांगितली. देव आणि दानव दोन्ही एकाच लोकांत राहू लागले. काळानुसार द्वापर युग आलं, तेव्हा देव आणि दानव एकाच कुटुंबात, एकाच लोकांत राहू लागले. आता आपण ज्या युगात आहोत, कलियुगात, देव आणि दानव दोन्ही एकाच देहात निवास करतात."
"आशुतोष राणा" किरदार रावण का निभा रहे थे
— वीरू यादव (@VeerooYada39822) October 4, 2025
और फर्ज प्रभु राम का।❤️❤️
आशुतोष सर से किसी ने पूछा क्या आप को पता है
पूरे भारत में रावण का मंदिर कहा है ?
आशुतोष राणा जी ने जवाब ऐसा दिया कि दिल खुश हो गाया बहुत सुन्दर जवाब दिया।❤️💯 pic.twitter.com/QViMiL5bGZ
या उत्तरात आशुतोष राणा यांनी केवळ इतिहास आणि पुराणांची समजच दाखवली नाही, तर हेही सांगितलं की चांगुलपणा आणि वाईटपणा प्रत्येक युगात मानवी जीवनाचा भाग राहिले आहेत. त्यांचा हा दृष्टिकोन शिकवतो की रावण केवळ वाईटपणाचं प्रतीक नाही, तर त्याच्यातही ज्ञान, साहस आणि आत्मविश्वास यांसारखे गुण दडलेले आहेत. त्यांनी हे सिद्ध केलं की कोणत्याही पात्राला किंवा प्रतीकाला फक्त चांगुलपणा-वाईटपणात बांधून पाहिलं जाऊ नये. जीवनात देव आणि दानव दोन्ही आपल्या आसपास राहतात, आणि आपण त्यांना समजून स्वीकारलं पाहिजे.
त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की, मी तुम्हाला बोलवू इच्छितो, बैजनाथ, हिमाचलमध्ये रावणाचं एक मंदिर आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की रावणाचा सन्मान देखील आपल्या संस्कृतीत आहे.