धनुषच्या खांद्यावरील तीळ गेला कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:10 IST2017-03-21T06:40:47+5:302017-03-21T12:10:47+5:30

साऊथ स्टार आणि मेगास्टार रजनीकांतचा जावई धनुष सध्या अडचणीत सापडला आहे. धनुष हा आपला घरातून पळून गेलेला मुलगा असल्याचा ...

Where did the mole on the shoulder go? | धनुषच्या खांद्यावरील तीळ गेला कुठे?

धनुषच्या खांद्यावरील तीळ गेला कुठे?

ऊथ स्टार आणि मेगास्टार रजनीकांतचा जावई धनुष सध्या अडचणीत सापडला आहे. धनुष हा आपला घरातून पळून गेलेला मुलगा असल्याचा दावा एका दांम्पत्याने केला आहे. सध्या मद्रास हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. तूर्तास या केसला नवी कलाटणी मिळाली आहे. होय, धनुषचा मेडिकल रिपोर्ट भलतीकडेच इशारा करतोय. यामुळे धनुषच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, धनुषने त्याच्या खांद्यावरचा तीळ सर्जरी करून मिटवला असू शकतो, अशी शक्यता वैद्यकीय अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
 कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या तामिळ दांम्पत्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.  धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता, असा दावा या दांम्पत्याने केला होता. त्यानुसार, न्यायालयाने धनुषचे बर्थ मार्क व्हेरिफिकेशनचा आदेश दिला होता. सोमवारी याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.   सध्या धनुषच्या खांद्यावर कुठलाही तीळ नाही, असे यात म्हटले आहे. पण हे सांगतानाच सर्जरीद्वारे हा तीळ मिटवणे शक्य आहे, असेही वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने आता नवीन वैद्यकीय अहवाल मागवला आहे.त्यामुळे धनुषच्या या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची श्क्यता आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २७ मार्चला होणार आहे.

ALSO READ : ​धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!

 दरम्यान धनुषने तामिळ दांम्पत्याचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत या दांपत्याने केलेला दावा हा पूर्णत: खोटा आहे. यांच्या हरवलेल्या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. मला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, असे त्याने म्हटल्ो आहे. धनुषकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तुरी राजा यांचा मुलगा असून, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐवर्श्या हिचा पती आहे. धनुष बॉलिवूडमध्ये त्याच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्यातून चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने सोनम कपूरबरोबर ‘रांझणा’ या सिनेमात काम केले. या सिनेमानंतर तो महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षरा हसन यांच्याबरोबर ‘षमिताभ’मध्येही बघावयास मिळाला होता. 

 

Web Title: Where did the mole on the shoulder go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.