क्रितीच्या ड्रेससाठी कुठून आल्या दोन हजारांच्या इतक्या नोटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:53 IST2016-12-15T12:53:56+5:302016-12-15T12:53:56+5:30

पाचशे व हजाराच्या नोटबंदीनंतर संपूर्ण देश नोटांच्या तुटवड्याने हैरान झाला असताना अभिनेत्री क्रिती सेनॉन २००० रूपयांच्या नोटांनी बनलेला ड्रेस ...

Where are the coins of two thousand coins for the dress? | क्रितीच्या ड्रेससाठी कुठून आल्या दोन हजारांच्या इतक्या नोटा?

क्रितीच्या ड्रेससाठी कुठून आल्या दोन हजारांच्या इतक्या नोटा?

चशे व हजाराच्या नोटबंदीनंतर संपूर्ण देश नोटांच्या तुटवड्याने हैरान झाला असताना अभिनेत्री क्रिती सेनॉन २००० रूपयांच्या नोटांनी बनलेला ड्रेस घालून मिरवते म्हणजे, अतीच झाले हं. क्रितीच्या या ड्रेससाठी २ हजाराच्या इतक्या नोटा आल्या कुठून? असा प्रश्न पडणे त्यामुळे साहजिक आहे. पण आता या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हा-आम्हाला कष्ट घेण्याची गरज नाहीयं. कारण खुद्द क्रितीनेच या प्रश्नाचे उत्तर दिलेयं. 
 क्रितीचा २ हजारांच्या नोटांनी बनलेला ड्रेस पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता इतकी चर्चा म्हटल्यावर, क्रितीने स्वत:च या प्रश्नाचे उत्तर देणे योग्य समजले. खरे तर क्रितीचा हा ड्रेस खरा नाही. तर फोटो शॉपचा कारनामा आहे.  होय, क्रितीने तिच्या फॅन क्लबच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. शिवाय  २ हजारांच्या नोटांनी बनलेल्या या ड्रेसचा फोटोही शेअर केला आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}


अगदी अलीकडे एका अवार्ड शोमध्ये क्रिती एका व्हाईट गाऊनमध्ये दिसली होती. काहींनी शक्कल लढवत,  फोटोशॉपच्या माध्यमातून या व्हाईट गॉऊनला २ हजारांच्या नोटांनी रिडिझाईन केले. ‘काही लोक माझा मॉर्फ केलेला फोटो सकुर्लेट करीत आहेत. ज्यामुळे मी पार थकलेय. अनेक संकेतस्थळे हा फोटो पोस्ट करीत आहे. कृपया, अशा फोटोंपासून दूर राहा,’ असे क्रितीने या ड्रेसमागचे सत्य सांगताना स्पष्ट केले आहे. शिवाय फोटो शॉप करणा-या शक्कलबाजांचीही तारीफ केली आहे.

क्रिती सध्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय तिचा ‘राबता’ हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 

Web Title: Where are the coins of two thousand coins for the dress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.