जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी श्रीदेवी आणि जया प्रदाला एकाच खोलीत केले होते बंद...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:22 IST2018-02-25T04:52:00+5:302018-02-25T10:22:00+5:30
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड स्तंब्ध झाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘ही बातमी खोटी असावी’ असे म्हटले ...

जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी श्रीदेवी आणि जया प्रदाला एकाच खोलीत केले होते बंद...!
अ िनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड स्तंब्ध झाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘ही बातमी खोटी असावी’ असे म्हटले आहे. बॉलिवूडच्या या पहिल्या फिमेल सुपरस्टारने चित्रपटात आपल्या डान्स, अॅक्टिंग आणि चंचळपणामुळे चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. हेच कारण होते की, जेव्हा तिने २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातुन दुसºयांदा बॉलिवूडमध्ये कमबॅकक केले तेव्हा प्रेक्षकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. असो, आम्ही तुम्हाला श्रीदेवीच्या करिअरमधील एक किस्सा सांगणार आहोत. वास्तविक बॉलिवूडमध्ये नेहमीच दोन मेल आणि फिमेल सुपरस्टारमध्ये कोल्डवॉर असतो. असाच काहीसा कोल्डवॉर १९८० च्या दशकात श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यात होता.
दोघीही त्याकाळी बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री होत्या. अशात त्या नेहमीच एकमेकींशी स्पर्धा करायच्या. त्यामुळे त्यांच्यात कधीच सर्वकाही आलबेल राहिले नाही. दोघी सार्वजनिक ठिकाणीदेखील एकमेकींवर टीका करण्याची संधी सोडत नसायच्या. अशात ‘मकसद’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा काही प्रसंग घडला ज्यामुळे इंडस्ट्री दंग राहिली.
१९८४ मध्ये रिलिज झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी आणि जया प्रदा मुख्य भूमिकांमध्ये होत्या. तर त्यांच्यासोबत सुपरस्टार राजेश खन्ना आणि जीतेंद्र यांच्या भूमिका होत्या. असे म्हटले जाते की, चित्रपटाची शूटिंग जोरदार सुरू होती. एक दिवस राजेश खन्ना आणि जीतेंद्र यांनी या दोघींना एकत्र मेकअप रूममध्ये बंद केले होते. दोघींमध्ये वाद संपुष्टात यावे, त्यांच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते. परंतु जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा वेगळेच चित्र बघावयास मिळाले. दोघीही एकमेकींपासून बºयाच अंतराव बसलेल्या होत्या. शिवाय त्यांनी एकमेकींशी संवादही साधला नव्हता.