जब सोना मोहापात्रा को ‘आयआयटी-बी’पे गुस्सा आता हैं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 11:07 IST2016-12-17T11:07:26+5:302016-12-17T11:07:57+5:30
‘अंबरसरिया’ सिंगर सोना मोहापात्राने सोशल मीडियावर देशातील अग्रणी शैक्षणिक संस्था आयआयटी-मुंबईवर जोरदार हल्ला चढवला आहे. ने लिहिलेले टीकात्मक फेसबुक ...
.jpg)
जब सोना मोहापात्रा को ‘आयआयटी-बी’पे गुस्सा आता हैं...
‘ ंबरसरिया’ सिंगर सोना मोहापात्राने सोशल मीडियावर देशातील अग्रणी शैक्षणिक संस्था आयआयटी-मुंबईवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ने लिहिलेले टीकात्मक फेसबुक पोस्ट सध्या नेटिझन्समध्ये प्रचंड व्हायरल होतेय.
आयआयटी-मुंबई कॉलेजमधील प्रसिद्ध कल्चरल फेस्टिव्हल ‘मूड इंडिगो’मध्ये महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिले जाते तसेच त्यांना मानधान देण्यातही दिरंगाई केली जाते, असे घणघणाती आरोप तिने केले आहेत.
तिने पोस्टमध्ये म्हटले की, ‘मागच्या तीन वर्षांपासून मला आयआयटी मुंबईच्या फेस्टिव्हल समितीकडून विचारणा होतेय. पण दरवेळी त्यांची एक अट (त्याला आपण ‘वॉर्निंग’ म्हणू शकतो) असते की, मानधन ते ठरवतील आणि तेच घ्यावे लागेल आणि मी एकटी परफॉर्म करू शकत नाही. माझ्यासोबत कोणी तरी पुरुष गायक असलाच पाहिजे. म्हणजे एकटी महिला सिंगर असेल तर कार्यक्रमाला शोभा येत नाही किंवा त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, असा त्यांचा समज आहे.’
या पोस्टमध्ये तिने कार्यक्रम पत्रिकासुद्धा शेअर केली आणि दाखवून दिले की, कशा प्रकारे या फे स्टिव्हलमध्ये केवळ पुरुष कलाकारांना अधिक महत्त्व दिले जाते. ती पुढे लिहिते, ‘आशिया खंडातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे श्रेय तुम्ही स्वत:ला देता आणि जगातील सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून बिरुदावली मिरवता, मला तर तुमच्या या दाव्यावर हसू येते.’
सोनाचा रोष केवळ आयआयटी मुंबईवरच शांत झाला नाही तर तिने देशभरातील कॉलेजेसना पुरुषकेंद्री फे स्टिव्हल भरवण्यावरून फैलावर घेतले. तिच्या मते, महिला कॉलेज जर सोडले तर सगळ्याच कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरुष कलाकारांना प्राधान्य दिले जाते. महिला तर केवळ कार्यक्रमाच्या सुरुवातील तडका मारण्यासाठी आमंत्रित असतात. वरून आम्हाला मानधनही कमी दिले जाते आणि तेसुद्धा वेळेवर मिळत नाही.
तिच्या अशा खुल्या टीकेमुळे सध्या ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच गाजत आहे. या फेस्टिव्हलवर टीका होण्याची पहिलीच वेळ नसून काही वर्षांपूर्वी सवंग प्रसिद्धीसाठी ‘प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन येणार’ म्हणून खोटी माहिती आयोजकांनी पसरवली होती.
सोनाच्या आरोपांचे खंडन करीत कॉलेज प्रवक्त्याने म्हटले की, ‘तिने केलेले सर्व आरोप आणि टीका निराधार असून आमची संस्था महिलांना कधीच दुजाभाव देत नाही आणि लिंगभेद तर केलाच जात नाही. संस्थेच्या फॅकल्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश असून येथे अनेक मुली तंत्रज्ञाच्या क्षेत्रात पदवीशिक्षण घेत आहेत. तिने सांगितलेले मानधान आमच्या बजेटमध्ये बसत नव्हते म्हणून बोलणी यशस्वी होऊ शकली नाही, एवढेच सत्य आहे.