जेव्हा अडचणीत होता सलमान खान तेव्हा याचे नाव घेतले अन् झाला सुपरस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 17:33 IST2017-11-02T12:02:56+5:302017-11-02T17:33:19+5:30

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याला त्याच्या दिलदारपणासाठी ओळखले जाते. परंतु जेव्हा सलमान अडचणीत होता तेव्हा या साउथच्या अभिनेत्याच्या एका चित्रपटाने त्याला सुपरस्टार केले.

When Salman Khan was in trouble then his name was taken and the superstar! | जेव्हा अडचणीत होता सलमान खान तेव्हा याचे नाव घेतले अन् झाला सुपरस्टार!

जेव्हा अडचणीत होता सलमान खान तेव्हा याचे नाव घेतले अन् झाला सुपरस्टार!

लिवूडमध्ये साउथ चित्रपटाच्या रिमेकची नेहमीच क्रेझ राहिली आहे. जेव्हा हे रिमेक हिट होतात तेव्हा ही बाब सिद्ध होते की, साउथ चित्रपट किती दमदार आहेत. दिग्दर्शक गौतम मेनन यांनी तर त्यांच्याच ‘फोर्स’ या साउथ चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला अन् तो हिटही झाला. तसेच सलमान खाननेदेखील विक्रमच्या ‘सेतू’ या चित्रपटाची निवड करीत त्याचा हिंदीत रिमेक बनविला. पुढे तो चित्रपट हिट झाला अन् सलमानच्या करिअरला जणू काही उभारीच मिळाली. त्या चित्रपटाचे नाव ‘तेरे नाम’ असे होते. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. आता विक्रम ‘धु्रव नक्षत्रम’ घेऊन येत असून, त्यांचा हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिजर रिलीज करण्यात आला असून, त्यास प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 



विक्रमचा ‘ध्रुव नक्षत्रम’ बºयाच कारणांनी चर्चेत आहे. कारण या स्पाय थ्रिलरविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाला गौतम मेनन यांनी दिग्दर्शित केले आहे. त्यांनी हा चित्रपट तीन पार्टमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची भारताबरोबरच बुल्गारिया, स्लोवेनिया, जॉर्जिया, अबू धाबी आणि तुर्की याठिकाणी शूटिंग करण्यात आली आहे. चित्रपटात विक्रमबरोबर ऐश्वर्या राजेश आणि रितु वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रोडक्शनचे काम याच वर्षी जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आले होते. चित्रपटाचा पहिला पार्ट एप्रिल २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. 



विक्रम त्याच्या प्रत्येक चित्रपटात गेटअप आणि अभिनयात काही तरी प्रयोग करीत असतो. याही चित्रपटात त्याने असेच काहीसे प्रयोग केल्याचे टिझरमध्ये दिसत आहे. ५१ वर्षीय विक्रम या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्यावर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. 

Web Title: When Salman Khan was in trouble then his name was taken and the superstar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.