बाबो! Saif Ali Khan ला Amrita Singh सोबतचा घटस्फोट पडला होता चांगलाच महागात, पोटगीच्या रूपात दिले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:47 PM2021-12-29T15:47:05+5:302021-12-29T15:53:24+5:30

सैफ अली खान(Saif Ali Khan) ने अमृता सिंग(Amrita Singh) पासून घटस्फोट घेतला, तेव्हा त्याला अमृताला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली.

When saif ali khan revealed he had paid 5 crore alimony to ex wife amrita singh post divorce in 2004 | बाबो! Saif Ali Khan ला Amrita Singh सोबतचा घटस्फोट पडला होता चांगलाच महागात, पोटगीच्या रूपात दिले इतके कोटी

बाबो! Saif Ali Khan ला Amrita Singh सोबतचा घटस्फोट पडला होता चांगलाच महागात, पोटगीच्या रूपात दिले इतके कोटी

googlenewsNext

 बी-टाऊनमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांना नाचचं संपवायला मोठी किंमत मोजावी लागली.याच यादीत सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) चे नावदेखील येतं.  सैफ अली खानने अमृता सिंगपासून घटस्फोट घेतला, तेव्हा त्याला अमृताला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली.

3 महिन्यांच्या डेटनंतर सैफ आणि अमृताने 1991 मध्ये गुपचूप लग्न केले.या दोघांच्या वयामध्ये खुप अंतर होते. अमृता सैफपेक्षा जवळपास 12 वर्षे मोठी होती. दोघांनी सांगितले होते की, त्यांनी लग्नाच्या 2 महिन्यांपुर्वीच आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

सैफ आणि अमृता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश होते. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले.2004 मध्ये ते दोघं वेगळे झाले. अमृता आणि सैफचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण इटालियन मॉडल रोजासोबत सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले गेले. 

 एका मुलाखतीत सैफने सांगितले की, घटस्फोद देते वेळी ५ कोटीं रुपये पोटगी अमृताला दिली जाणार असल्याचे निश्चित झाले होते. २.५ कोटी आधीच देण्यात आले होते. या व्यतिरिक्त मुलांच्या खर्चासाठी १ लाख दर महिना सैफला द्यावे लागतात. 

 अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफेने वयाने त्याच्यापेक्षा 10 वर्षे लहान असलेल्या करीनासोबत 16 अक्टोबर 2012 मध्ये लग्न केले. दोघांचाही सुखी संसार सुरू आहे.

Web Title: When saif ali khan revealed he had paid 5 crore alimony to ex wife amrita singh post divorce in 2004

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.