‘रईस’चे डायलॉग जेव्हा बॅटमॅन आणि जोकर बोलतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:57 IST2016-12-20T17:53:29+5:302016-12-20T17:57:19+5:30

एका फॅनने ‘रईस’च्या ट्रेलरची ‘द डार्क नाईट’ चित्रपटातील दृश्यांशी अशी काही चतुराईने सांगड घातली आहे की हसू आवरणे शक्य होत नाही. तुम्ही पण पाहा.

When the 'Rais' dialogue talks Batman and Joker ... | ‘रईस’चे डायलॉग जेव्हा बॅटमॅन आणि जोकर बोलतात...

‘रईस’चे डायलॉग जेव्हा बॅटमॅन आणि जोकर बोलतात...

हरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर आला आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. लाडक्या किंग खानला पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. एका फॅनचा उत्साह एवढा की, आॅफिशियल ट्रेलर पाहून मन नाही भरले नाही म्हणून त्याने ‘रईस’चे एक आगळेवेगळे ट्रेलर तयार केले.

जरा कल्पना करा की, ‘द डार्क नाईट’ या बॅटमॅन फिल्ममधील पात्र जर ‘रईस’चे डॉयलॉग बोलू लागले तर? विचित्र वाटतेय ना? अहो पण तुम्ही जर ‘रईस’चे ‘बॅटमॅन मॅशअप ट्रेलर’ पाहिले तर हसून हसून तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत.

या मॅशअपमध्ये शाहरुखचे डॉयलॉग ‘द डार्क नाईट’मधील ‘जोकर’च्या तोंडी तर नवाजुद्दिन सिद्दिकीचा आवाज बॅटमॅनला असा काही परफेक्ट बसवला आहे की, पाहणाऱ्याला जणू काही खरेखुरे ट्रेलर असल्याचा भास होतो. मूळ ट्रेलरच्या तोडीस तोड असेच या व्हिडियोचे वर्णन करावे लागेल.

                                  

मॅशअप ट्रेलरमधील सर्वात मजेशीर सीन म्हणजे शाहरुखचा आयकॉनिक डॉयलॉग ‘आ रहा हूं  मैं’ जोकरच्या तोंडी इतका चपखल बसतो की, विचारूच नका. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ‘द डार्क नाईट’मध्ये (२००८) हीथ लेजर या दिवंगत अभिनेत्याने द जोकरची भूमिका केली होती. त्यासाठी त्याला सर्वोत्कृ ष्ट सहअभिनेत्याचा मरणोत्तर आॅस्कर पुरस्कार देण्यात आला.

बऱ्याच महिन्यांपासून ‘रईस’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हा फनी व्हिडिओ स्पेशल ट्रीट आहे. ओरिजिनल ट्रेलरला आतापर्यंत २.८ कोटींपेक्षा जास्त व्ह्युवज् मिळालेले असून केवळ पहिल्या तीन दिवसांमध्येच त्याने सलमान खानच्या ‘सुल्तान’च्या ट्रेलरला मागे पाडले.

राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार असून त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या हृतिकच्या ‘काबील’शी त्याची बॉक्स आॅफिसवर टक्कर होणार आहे. ‘काबील’मध्ये हृतिक आणि यामी गौतम अंध प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: When the 'Rais' dialogue talks Batman and Joker ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.