फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल
By तेजल गावडे | Updated: November 10, 2020 13:39 IST2020-11-10T13:38:53+5:302020-11-10T13:39:24+5:30
सारा अली खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती फोटोग्राफर्ससमोर पोज देताना दिसते आहे.

फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी सारा अली खान, सुशांत सिंग राजपूत निधनातील ड्रग्स कनेक्शमुळे चर्चेत आली होती. नुकताचा सारा अली खानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. ज्यात सारा फोटोग्राफर्ससमोर पोज देताना दिसते आहे. यादरम्यान सारा अली खानला एका फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगितली. त्यावर साराने जबरदस्त उत्तर दिले आहे. सारा अली खानचा हा व्हिडीओ बॉलिवूड हेल्पलाइनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सारा अली खान व्हिडीओमध्ये डेनिम शॉट्स, पिंक शर्टमध्ये दिसते आहे. व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, फोटोग्राफर तिला समोर बघ असे सांगत आहेत. त्यावर सारा शेवटी बोलते की, मी सगळ्यांकडे पाहत आहे. यादरम्यान सारा अली खानला एक फोटोग्राफर म्हणाला सारा जी नमस्तेवाली पोज तर द्या. त्यावर ती म्हणाली की, नमस्ते माझी पोज नाही. सारा अली खानच्या व्हिडीओवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत. साराचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे.
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती कुली नंबर वनमध्ये दिसणार आहे. यात सारासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरच्या महिन्याखेरीस रिलीज होऊ शकतो.
याशिवाय सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत अतरंगी रेमध्ये दिसणार आहे.