एक किस्सा...! प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ करून पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येही फेमस झाल्या होत्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:00 AM2021-12-31T08:00:00+5:302021-12-31T08:00:12+5:30

Padmini Kolhapure : तर गोष्ट आहे 1980 सालची. प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले होते....

When Padmini Kolhapure greeted Prince Charles with garland and kiss, was 'left embarrassed' later | एक किस्सा...! प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ करून पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येही फेमस झाल्या होत्या...!!

एक किस्सा...! प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ करून पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येही फेमस झाल्या होत्या...!!

googlenewsNext

पद्मिनी कोल्हापुरे ( Padmini Kolhapure) हे नाव कोणीच विसरू शकणार नाही. हे नाव आठवलं की ठळकपणे आठवतो तो प्रेम रोग हा सिनेमा आणि पाठोपाठ सौतन, सात दिन, प्यार झुकता नाही, असे अनेक सिनेमे डोळ्यांपुढे येतात. पद्मिनी बॉलिवूडमध्ये आल्या होत्या त्या गायिका बनायला. पण बनल्या अभिनेत्री. 80 च्या दशकात त्यांची मोठी क्रेझ होती. याच काळात पद्मिनींसोबत एक अशी घटना घडली होती की ज्यामुळे त्या अगदी ब्रिटनमध्येही फेमस झाल्या होत्या.

तर गोष्ट आहे 1980 सालची. प्रिन्स चार्ल्स (Prince Charles ) भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारतात आल्यावर काय तर प्रिन्स यांनी बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? अधिका-यांची लागलीच लगबग सुरू झाली आणि प्रिन्स चार्ल्स आपल्या ताफ्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले. या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापुरे यांच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या सिनेमाचं शूटींग सुरु होतं.

चार्ल्स आलेत म्हटल्यावर पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी पोहोचल्या. आधी अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्स यांची आरतीचं ताट हातात घेऊन, त्यांना ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आल्यात. पण हे काय? आधी त्यांनी प्रिन्सच्या गालाचं चुंबन घेतलं आणि नंतर त्यांच्या गळ्यात माळ घातली.

या प्रकरणाचर चर्चा होणारच होती. कारण त्यावेळी भारतातल्या अभिनेत्रीने किस करणं फार काही सामान्य बाब नव्हती. अगदी सिनेमातही किसचा सीन आला की, दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकायचे. अशात पद्मिनींनी चार्ल्सच्या गालावर किस केला म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स चार्ल्सचं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे तर अगदी ब्रिटनमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती.

पद्मिनी यांना आजही याचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीत त्या यावर बोलल्या होत्या. ‘त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं.   मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स चार्ल्सना किस करणाऱ्या तुम्हीच का? असं मला विचारलं होतं आणि ते ऐकून मला लाज वाटली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.  

Web Title: When Padmini Kolhapure greeted Prince Charles with garland and kiss, was 'left embarrassed' later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.