... म्हणून अभिनेत्री नूतन यांना त्यांचाच सिनेमा थिएटरमध्ये बघण्यापासून रोखण्यात आलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:33 PM2020-07-31T13:33:34+5:302020-07-31T13:47:28+5:30

एक असा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. नूतन यांना त्यांनी काम केलेला सिनेमाच कधी बघू दिला गेला नव्हता. असं का केलं हेच आज जाणून घेऊ...

When Nutan was denied entry to her own film's premiere | ... म्हणून अभिनेत्री नूतन यांना त्यांचाच सिनेमा थिएटरमध्ये बघण्यापासून रोखण्यात आलं होतं!

... म्हणून अभिनेत्री नूतन यांना त्यांचाच सिनेमा थिएटरमध्ये बघण्यापासून रोखण्यात आलं होतं!

googlenewsNext

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा अभिनेत्री नूतन यांचं नाव त्या यादीत असेल. अनेक वर्ष आपल्या बहारदार अभिनयामुळे आणि सौंदर्याने नूतन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण त्यांच्याबाबतचा एक असा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. नूतन यांना त्यांनी काम केलेला सिनेमाच कधी बघू दिला गेला नव्हता. असं का केलं हेच आज जाणून घेऊ...

हिंदी सिनेमातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक राहिलेली नूतनचा जन्म २४ जून १९३६ रोजी झाला होता. अवघ्या ५ वर्षाच्या असताना नूतन यांनी मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये परफॉर्मन्स दिला होता. तर पुढे ९ वर्षाच्या असताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या 'नल दमयंती' सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. पुढे १९५० मध्ये नूतन यांनी वयाच्या १४ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन नूतन यांच्या आई शोभना समर्थ यांनी केले होते.

नूतन यांना एक अभिनेत्री म्हणून सगळेच ओळखतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, नूतन यांनी १९५२ मिस इंडिया किताब मिळवला होता. महत्वाची बाब म्हणजे सिनेमात येऊन दोन वर्षे झाल्यावर त्यांनी हा किताब मिळवला होता. महत्वाची बाब म्हणजे त्या मिस इंडिया ठरल्या तेव्हा त्यांचा 'नगीना' सिनेमा येणार होता. त्यावेळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मोठाले होर्डिंग्स लावून सांगण्यात आले होते की, नूतन यांना मिस इंडिया किताब मिळाला. पण हाच नगीना सिनेमा त्यांना बघू दिला गेला नव्हता.

नगीना सिनेमा बघण्यासाठी गेलेल्या नूतन यांना वॉचमनने थिएटरमध्ये प्रवेशच करू दिला नाही. याचं मुख्य कारण त्यांचं १४ वर्षे वय सांगितलं जातं. त्यांना हा सिनेमा न बघताच घरी परतावे लागले होते. कारण म्हणजे हा नूतन यांनी काम केलेला हा सिनेमा अ‍ॅडल्ट सिनेमा होता. या सिनेमाला ए सर्टिफिकेट मिळाले होते.

भारतीय सिनेमाची सर्वात चांगल्या अभिनेत्री नूतन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ६ वेळा फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड देण्यात आला. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत नूतन यांच्या या रेकॉर्डची बरोबरी फक्त तिची भाची आणि बहिण तनुजाची मुलगी काजोलच पोहोचली आहे.

कुठे हरवली राजकपूरची ही हिरोईन? पाहा, मंदाकिनीचे वेड लावणारे काही Rare Photos

Sanjay Dutt Birthday: संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त पहा त्याच्या बालपणीचे काही फोटो  

Web Title: When Nutan was denied entry to her own film's premiere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.