जेव्हा वडिलांशी खोटं बोलून फ्लाईट पकडून लास वेगासला गेली होती जान्हवी कपूर, स्वतःच केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 12:23 PM2021-03-06T12:23:23+5:302021-03-06T12:25:43+5:30

जान्हवीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा असते.

When janhvi kapoor took a flight to las vegas without telling boney kapoor | जेव्हा वडिलांशी खोटं बोलून फ्लाईट पकडून लास वेगासला गेली होती जान्हवी कपूर, स्वतःच केली पोलखोल

जेव्हा वडिलांशी खोटं बोलून फ्लाईट पकडून लास वेगासला गेली होती जान्हवी कपूर, स्वतःच केली पोलखोल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर  आज आपला वाढदिवस  साजरा करते आहे. ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्मात बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा असते. फार कमी वेळात तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 
जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्या अगदी क्लोज आहे असे असेल तरी, वडिलांशी खोटे बोलून ट्रिपला गेली असल्याचा खुलासा केला आहे.

जान्हवी कपूरने काही महिन्यांपूर्वी करीना कपूरच्या चॅट शोमध्ये आली होती त्यावेळी तिने हा खुलासा केला. या चॅट दरम्यान जान्हवी कपूरने सांगितले होते की, एकदा तिने आपले वडील बोनी कपूर यांच्याशी खोटे बोलली होती. ती म्हणाली, एकदा खोटे बोलून लास वेगासला ट्रिपला गेली होती. वडिलांना सांगितले की ती एक सिनेमा पाहायला जातेय आणि फ्लाईट पकडून ती लस वेगाला गेली.  लॉस एंजेलिसहून लस वेगासला जाऊन संपूर्ण दिवस तिकडे फिरवून परत लॉस एंजेलिसला आली. 

वर्क फ्रंटबद्दल बोलताना जान्हवीने इशान खट्टरच्या अपोझिट 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' सिनेमा रिलीज झाला होता. या शिवाय जान्हवी करण जोहरच्या  'दोस्ताना 2' आणि 'तख्त'मध्येही काम करणार आहे. सध्या जान्हवीचा आगामी सिनेमा 'रुही'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.. रुही सिनेमात जाह्नवीच्या अंगात एक भूत शिरते आणि राजकुमार राव आणि वरुण शर्मा जाह्नवी कपूरचे अपहरण करतात, परंतु या अपहरणानंतर तिचे रूप बदलते. 11 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: When janhvi kapoor took a flight to las vegas without telling boney kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.