जेव्हा अनुष्का म्हणते,‘ बस कर यार...!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 11:50 IST2016-07-12T06:20:21+5:302016-07-12T11:50:21+5:30

 रणवीर सिंगचे व्यक्तिमत्त्व हे अतिशय बिनधास्त आणि धमाकेदार असे आहे. त्याला कुठल्याही सोहळयात केवळ सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर एक कलाकार ...

When Anushka says, 'Just make man ...!' | जेव्हा अनुष्का म्हणते,‘ बस कर यार...!’

जेव्हा अनुष्का म्हणते,‘ बस कर यार...!’

 
pan style="line-height: 20px;">रणवीर सिंगचे व्यक्तिमत्त्व हे अतिशय बिनधास्त आणि धमाकेदार असे आहे. त्याला कुठल्याही सोहळयात केवळ सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून बसावे वाटते. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे तो एखादा इव्हेंट किंवा क्षण एन्जॉय करत असतो.

नुकतेच पॅरिसमध्ये ‘सुल्तान’ चा एक शो थिएटरमध्ये चालू होता. त्यावेळी रणवीर सिंग अचानक तिथे आला आणि त्याने स्टेजवर जाऊन ‘बेबी को बेस पसंद हैं’ आणि ‘440 व्होल्ट ’ या गाण्यावर डान्स करायला सुरवात केली.

तेव्हा रणवीरच्या एका फॅन क्लबने याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यात या फोटोच्या मागे अनुष्काने हात जोडलेले दिसत आहेत. जणू काही ती म्हणते आहे की,‘ बस कर यार...!’ वेल, अनुष्का-रणवीर यांनी ‘बँड बाजा बारात’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री-रिलेशन फारच वेगळे आहे. 

Web Title: When Anushka says, 'Just make man ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.