अस्सा नवरा सुरेख बाई! अन् आनंद अहुजाने बांधली पत्नी सोनमच्या बुटांची लेस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:18 PM2019-04-19T12:18:18+5:302019-04-19T12:19:03+5:30

सोनम कपूर आणि आनंद अहुजा बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे, यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

when anand ahuja went down on knees to tie sonam kapoors shoelace | अस्सा नवरा सुरेख बाई! अन् आनंद अहुजाने बांधली पत्नी सोनमच्या बुटांची लेस!!

अस्सा नवरा सुरेख बाई! अन् आनंद अहुजाने बांधली पत्नी सोनमच्या बुटांची लेस!!

googlenewsNext
ठळक मुद्देआनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून सुरू झाली आणि 2018 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकलेत.

सोनम कपूर आणि आनंद अहुजा बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे, यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. आनंद सोनमची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. आता हेच बघा ना, सोनम बुट ट्राय करत असताना आनंदने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर तिची बुटांची लेस बांधून दिली.


होय, सोनम व आनंदचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय. दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगदरम्यानचा हा फोटो. यादरम्यान सोनमने एक शू पेयर ट्राय केली. सोनमन ाुट पायात टाकले आणि पुढच्याच क्षणाला आनंदने गुडघ्यावर बसत तिचे शू लेस बांधलेत. आनंद सोनमच्या बुटांची लेस बांधत होता तर सोनम मनातल्या मनात चक्क लाजत होती. स्टोरमधील अख्खे लोक दोघांकडे बघत होते. पण पत्नीच्या बुटांची लेस बांधण्यात मग्न असलेल्या आनंदला याची जराही पर्वा नव्हती. 
सध्या हा फोटो सोशल मीडियावर शेअर होतोय. सोनमने अगदी योग्य जोडीदार निवडला अशा अनेक प्रतिक्रिया हा फोटो पाहून उमटत आहेत. अर्थात यात काही जण सोनमला ट्रोल करणारेही आहेत.
आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून सुरू झाली आणि 2018 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकलेत. आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे.  आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.

Web Title: when anand ahuja went down on knees to tie sonam kapoors shoelace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.