जेव्हा आलिया परीचे डोळे पुसते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 11:12 IST2016-08-28T05:40:46+5:302016-08-28T11:12:49+5:30

 वाचून एवढे दचकून जाऊ नकात...कारण, बॉलीवूडचे काही कलाकार ‘ड्रीम टीम टूर’ साठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते तेव्हा एका परफॉर्मन्सनंतर परिणीतीला ...

When Alia wins her eyes ... | जेव्हा आलिया परीचे डोळे पुसते...

जेव्हा आलिया परीचे डोळे पुसते...

 
ाचून एवढे दचकून जाऊ नकात...कारण, बॉलीवूडचे काही कलाकार ‘ड्रीम टीम टूर’ साठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते तेव्हा एका परफॉर्मन्सनंतर परिणीतीला आनंदाश्रु आवरता आले नाहीत. म्हणून आलिया भट्टने तिला जवळ घेऊन तिला शांत केले.

झालं असं की,‘ परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, बादशाह, कॅटरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवन हे सर्व कलाकार न्यूयॉर्क मध्ये त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्सेस देण्यासाठी गेले होते. तेव्हा ‘बी टाऊन’ च्या कलाकारांमध्ये एवढी एकी निर्माण झाली की, ती आता अनेक  वर्षे टिकून राहिल यात काही शंका नाही.

एका परफॉर्मन्सवेळी परिणीती फारच नर्व्हस  होती. तो परफॉर्मन्स कसा होईल ? असे तिला वाटत होते. पण, तो परफॉर्मन्स झाल्यावर ती बॅकस्टेजला गेली तेव्हा तिला तिचे अश्रूच आवरता आले नाहीत. तेव्हा तिला आलिया भट्टने जवळ घेऊन तिला कम्फर्टेबल केले. तसेच नंतर कॅटरिना कैफ, वरूण धवन आणि करण जोहर यांनी तिला बिग कम्फर्टिंग हग दिले.

parineeti & alia

parineeti

Web Title: When Alia wins her eyes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.