जेव्हा ऐश्वर्याने अवॉर्ड शोमध्ये सर्वांसमोर रेखा यांना संबोधले होते 'आई', सगळ्यांच्या उंचावल्या होत्या भुवया

By तेजल गावडे | Updated: November 2, 2020 13:37 IST2020-11-02T13:36:56+5:302020-11-02T13:37:28+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांच्यामध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे.

When Aishwarya addressed Rekha in front of everyone in the award show as 'Mother', everyone's eyebrows were raised. | जेव्हा ऐश्वर्याने अवॉर्ड शोमध्ये सर्वांसमोर रेखा यांना संबोधले होते 'आई', सगळ्यांच्या उंचावल्या होत्या भुवया

जेव्हा ऐश्वर्याने अवॉर्ड शोमध्ये सर्वांसमोर रेखा यांना संबोधले होते 'आई', सगळ्यांच्या उंचावल्या होत्या भुवया

ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांच्यामध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. ऐश्वर्या, रेखाला आई संबोधते. एकदा जज्बा सिनेमासाठी जेव्हा रेखा ऐश्वर्याला पुरस्कार देत होती तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती की, आईच्या हातून हा पुरस्कार मिळणं सन्मानाची बाब आहे. त्यावर रेखा यांनी म्हटले होते की, अपेक्षा करते की कित्येक वर्षे मी अशीच तुला पुरस्कार देत राहीन.


तसेच रेखा यांनी एकदा ऐश्वर्याला इमोशनल पत्र लिहिले होते. खरेतर रेखा यांनी ऐश्वर्याच्या नावाने एका मासिकात भावनिक पत्र लिहित आपले प्रेम व्यक्त केले होते. त्यांनी या पत्राच्या सुरूवातीला मेरी ऐश असे लिहिले होते आणि पत्राच्या शेवटी रेखा माँ असे लिहिले होते. 


रेखा यांनी पत्रात ऐश्वर्याच्या कित्येक भूमिकांचा उल्लेख करत लिहिले होते की तू प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेस मग रियल लाइफमधील असो किंवा रिल लाइफमधील. त्यांनी लिहिले होते की, तुझ्यासारखी महिला ज्या नदी प्रमाणे असते जी कोणत्याही बनावटी शिवाय पुढे वाहत राहू इच्छिते आहे. ती तिच्या मार्गावर आपल्या ध्येयासोबत पोहचते की तिला तिची ओळख हरवू देणार नाही.


भलेही लोक हे विसरुन जातील की तू काय म्हणाली, तू काय केलेस, पण ते कधीच विसरू शकत नाही की तू त्यांना कोणती भावना दिलीस. तू हिंमतीची जिंवत उदाहरण आहे. तू तुझ्यामध्ये परिपूर्ण आहे. तुला जगाला काहीच सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. तू खूप लांबचा प्रवास निश्चित केला आहेस. कित्येक अडथळे पार केले आहेस आणि आश्चर्यकारक यश संपादन केले आहेस.
रेखा यांनी शेवटी लिहिले होतो की, जितक्या तुला भूमिका मिळाल्या त्या तू उत्तमरित्या साकारल्या आहेस. मात्र आराध्याची आईची भूमिका मला सर्वात जास्त आनंद देते. तुला नेहमी आनंद मिळो, यासाठी प्रार्थना करेन. तुला खूप सारे प्रेम, अशीच जगत रहा...रेखा माँ.

Web Title: When Aishwarya addressed Rekha in front of everyone in the award show as 'Mother', everyone's eyebrows were raised.