बेफिक्रेच्या सीन्समध्ये चुकीचे काय?; पहलाज निहलानींचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 19:50 IST2016-12-13T19:49:05+5:302016-12-13T19:50:56+5:30
चित्रपटांच्या एकांत दृश्यांवर कात्री चालविणासाठी ख्यात असलेल्या सेन्सॉर बोर्डाने किस सीन्सची भरमार असलेला व बट सीन असलेला ‘बेफिके्र ’ ...

बेफिक्रेच्या सीन्समध्ये चुकीचे काय?; पहलाज निहलानींचे स्पष्टीकरण
‘स्पेक्टर’ या बॉंडपटाचा किस सीन, ‘जंगल बुक’ या बाल चित्रपटाला देण्यात आलेले ए/यू प्रमाणपत्र, ‘बार बार देखो’मधील कॅटरिनाचा हॉट सीन यामुळे मागील काही महिन्यांपासून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी चांगलेच चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ‘बेफिके्र’च्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. किस सीन्सची भरमार असलेल्या ‘बेफिक्रे’ मध्ये एक बट सीन देखील आहे. हे दृष्य चित्रपटात कसा कायम राहिला किंवा त्यावर सेंसॉर बोर्डाने आक्षेप का घेतला नाही, यावर चर्चा रंगली आहे.
पहलाज निहलानी ‘बेफिके्र’च्या सेन्सॉरबद्दल म्हणाले, ‘ए दिल है मुश्किल’, ‘स्पेक्टर’ किंवा ‘तमाशा’मधील चुंबन दृष्य लांबलचक होते. याउलट बेफिक्रेचे किस सीन्स विखुरलेले व तुकड्यात व विविध ठिकाणी आहेत आणि ते कथानकाचा भाग आहेत. एक चित्रपट निर्माता म्हणून मला हे ठाऊक आहे ही माझे क थानकातील कोणते सीन्स कापले जाऊ शकतात. बेफि क्रेमधील किस सीन्स कापण्यात आले असते तर त्याचा कथानकावर परिणाम झाला असता. आदित्य चोपडांनी किस सीन्सचा वापर कथेचा एक भाग म्हणून केला आहे. आम्ही जर ते कापले असते तर कथेचा प्रवाह खंडित झाला असता.
पहलाज म्हणाले, गरज असती तर आम्ही नक्कीच त्यात कपात केली असती, तरी देखील आम्ही यात ५० टक्केपर्यंत कपात केली आहे. यापेक्षा अधिक कपात केली असती तर त्याचा परिणाम कथेवर झाला असता, असेही ते म्हणाले.