काय होती कॅन्सरने निधन झालेल्या ज्युनिअर महमूद यांची शेवटची इच्छा? मृत्यूपूर्वी केलेलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:28 PM2023-12-08T12:28:01+5:302023-12-08T12:28:24+5:30

Junior Mehmood : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्युनियर महमूद यांची दीर्घकाळ सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अखेर संपली आहे. गुरूवारी रात्री राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

What was the last wish of Junior Mehmood who died of cancer? A great statement made before death | काय होती कॅन्सरने निधन झालेल्या ज्युनिअर महमूद यांची शेवटची इच्छा? मृत्यूपूर्वी केलेलं मोठं वक्तव्य

काय होती कॅन्सरने निधन झालेल्या ज्युनिअर महमूद यांची शेवटची इच्छा? मृत्यूपूर्वी केलेलं मोठं वक्तव्य

६० आणि ७०च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्युनियर महमूद (Junior Mehmood) यांची दीर्घकाळ सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अखेर संपली आहे. गुरूवारी रात्री राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ज्युनियर महमूद यांच्या तब्येतीशी संबंधित बातम्या आल्या होत्या, त्यानंतर चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण त्यांनी जगाचा निरोप घेतला. ज्युनियर महमूद यांनी शेवटच्या दिवसात एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती, जी पूर्णदेखील झाली.

ज्युनियर मेहमूद यांना स्टेज ४ पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. खरंतर त्यांना बॉलिवूड सुपरस्टार जितेंद्र यांना भेटायचे होते. सचिन पिळगावकर यांच्या मदतीने त्यांची शेवटची ही इच्छा पूर्ण झाली. ज्युनियर महमूद यांच्या निधनाच्या काही दिवस आधी जितेंद्र यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती.

यावेळी ज्युनिअर महमूद यांची अवस्था पाहून जितेंद्र देखील भावूक झाले होते आणि त्यांचे डोळे पाणावले होते. ज्युनियर मेहमूद यांना हॉस्पिटलमध्ये भेटल्याचे जितेंद्र यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये जितेंद्र यांच्यासोबत जॉनी लिव्हरही हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महमूदची काळजी घेताना दिसत होते. हे फोटो पाहून चाहतेही भावुक झाले होते.

ज्युनियर महमूद यांनी व्यक्त केली आणखी एक शेवटची इच्छा 
याशिवाय ज्युनियर महमूद यांनी आणखी एक इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा ते या जगात नसतील तेव्हा जगाने त्यांना वाईट म्हणून नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावे, अशी त्यांची इच्छा होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली शेवटची इच्छा सांगितली होती. ते म्हणाले होते, 'मी एक सामान्य माणूस आहे, हे तुम्हाला आतापर्यंत कळलेच असेल. मला फक्त एवढंच वाटतं की मी मरेन तेव्हा जगाने म्हणावं की तो माणूस चांगला होता.

वर्कफ्रंट...
ज्युनियर मेहमूद यांनी ‘बॉम्बे टू गोवा’, ‘ब्रह्मचारी’, ‘गुरु और चेला’ या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्युनियर महमूद यांनी देश-विदेशातही अनेक स्टेज शो केले होते.

Web Title: What was the last wish of Junior Mehmood who died of cancer? A great statement made before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.