ट्विटर काय आता केवळ खुलासे देण्यासाठीचं उरलयं? कपिल शर्माचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 14:58 IST2018-03-25T09:28:52+5:302018-03-25T14:58:52+5:30

आजपासून (25 मार्च) कपिल शर्मा त्याचा नवाकोरा शो ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ घेऊन येतोय. पण हा शो प्रसारित ...

What is the use of twitter to reveal just now? Kapil Sharma's angry question | ट्विटर काय आता केवळ खुलासे देण्यासाठीचं उरलयं? कपिल शर्माचा संतप्त सवाल

ट्विटर काय आता केवळ खुलासे देण्यासाठीचं उरलयं? कपिल शर्माचा संतप्त सवाल

पासून (25 मार्च) कपिल शर्मा त्याचा नवाकोरा शो ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ घेऊन येतोय. पण हा शो प्रसारित होण्यापूर्वीचं काही भूतकाळातील ‘भूतं’ कपिलच्या मानगुटीवर बसू पाहात आहेत. होय, कपिल आणि त्याच्या या शोबद्दल नाही ते कानावर येऊ लागले आहे. कपिलच्या या शोच्या दुस-या एपिसोडसाठी टायगर श्रॉफ शूट करणार होता. पण हे शूट म्हणे, ऐनवेळी रद्द केले गेले. आता हे म्हणजे, अगदी तसेच होते, जसे याआधी कपिलसोबत झाले होते. गतवर्षीच्या  सुरुवातीलाच कपिलचे आणि सुनील ग्रोव्हरचे भांडण झाले होते. याचा फटका कपिलच्या जुन्या शोला बसला होता. यानंतर वारंवार कपिलची तब्येत बिघडायला लागली होती. यात अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊन शूटिंग न करताच परतावे लागले होते. याही वेळी नेमका हाच कित्ता गिरवला जात असलेला पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण आता कपिलनेच या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत याबद्दल संताप  व्यक्त केला आहे. ‘टायगर माझ्या दुसºया शोच्या शूटींगसाठी येणारचं नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबतचे शूट रद्द झाल्याचा प्रश्नचं येत नाही. काही तर आॅथेंसिटी ठेवा यार. ट्विटर काय आता केवळ स्पष्टीकरण अन् खुलासे देण्यासाठीचं उरले आहे. टायगर श्रॉफला ‘बागी2’साठी खूप शुभेच्छा. लवकरच भेटू...,’ असे कपिलने लिहिले आहे.


कपिलचा आज प्रसारित होऊ घातलेल्या नव्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अजय देवगण खास पाहुणा बनून येणार आहे. या एपिसोडचे शूटींग आधीच झाले आहे. मात्र दुस-या शोमध्ये टायगर ‘बागी2’ला प्रमोट करण्यासाठी येणार, अशी चर्चा होती. आता कपिल सांगतोय, त्यानुसार ही चर्चा म्हणजे अफवा होती.

ALSO READ : कपिल शर्माच्या नव्या शोचे शूटिंग रद्द, सेटवरुन शूट न करताच निघून गेला टायगर श्रॉफ

Web Title: What is the use of twitter to reveal just now? Kapil Sharma's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.