​WHAT ?? रिया सेनने चक्क खेचली सहअभिनेत्याची पॅन्ट !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:55 IST2017-08-04T10:23:53+5:302017-08-04T15:55:54+5:30

रिया सेन बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या रिया सेन एका वेबसीरिजमध्ये बिझी आहे. होय, डेली सोप क्विन ...

WHAT ?? Riya Sen gets a great pocket co-star! | ​WHAT ?? रिया सेनने चक्क खेचली सहअभिनेत्याची पॅन्ट !!

​WHAT ?? रिया सेनने चक्क खेचली सहअभिनेत्याची पॅन्ट !!

या सेन बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या रिया सेन एका वेबसीरिजमध्ये बिझी आहे. होय, डेली सोप क्विन एकता कपूरच्या ‘एमएमएस2’ या बेव सीरिजमध्ये रिया लीड रोलमध्ये आहे. सध्या याच वेब सीरिजचे शूटींग सुरु आहे. यात रिया अतिशय बोल्ड रोलमध्ये आहे. पण हे ‘बोल्ड कॅरेक्टर’ करता करता रिया भलतेच काही करून बसली. रियाने जे केले, ते ऐकून तुम्हीही चाट पडाल.
त्याचे झाले असे की, रियाला को-स्टार निशांत मलकानीसोबत एक लव्ह मेकिंग सीन द्यायचा होता. दिग्दर्शक सुयशने रियाला अधिकाधिक एक्सपोज करायला सांगितले. पण रियाला हे मान्य नव्हते. नेहमी अभिनेत्रीनेच एक्सपोज का करायचे, असे तिचे म्हणणे होते. तिने दिग्दर्शकाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण दिग्दर्शक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मग मात्र रियानेच सर्वांना धडा शिकवण्याचे ठरवले.



रियाने लव्ह मेकिंग सीन देताना निशांतला बेडवर आडवे केले अन् त्याची पॅन्ट एका झटक्यात खाली खेचली. मग काय, रियाच्या या वागण्याने निशांतची चांगलीच भंबेरी उडाली. एक क्षण तर कसे रिअ‍ॅक्ट करावे, हेच त्याला कळेना. रियाचे हे वागणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. रिया यानंतर हसत सुटली. वातावरण निवळले. पण यानंतर प्रत्येकाने रियाच्या या वागण्याला मनापासून दाद दिली. त्यामुळेच हा सीन वेब सीरिजमध्ये जशाच्या तसा दिसणार आहे.  
 रियाने एका मुलाखतीत हा सगळा किस्सा सांगितला. हो, मी असे केले. कारण दिग्दर्शक काहीच ऐकत नव्हते. नेहमी महिलाच का एक्सपोज करणार, पुरूष का नाही? त्यामुळेच मी हे केले, असे ती म्हणाली.
 

Web Title: WHAT ?? Riya Sen gets a great pocket co-star!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.