‘माझ्या हातात दिसतेय का अंगठी?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:39 IST2016-10-14T05:49:19+5:302016-10-17T11:39:27+5:30

सोनाक्षी सिन्हाला भडकलेलं तुम्ही कधी पाहिलंय? नाही ना..पण,अलीकडे सोनाचा पारा असा काही चढला की, ती एका पत्रकारावर चांगलीच भडकली़ ...

'What ring is in my hand?' | ‘माझ्या हातात दिसतेय का अंगठी?’

‘माझ्या हातात दिसतेय का अंगठी?’

नाक्षी सिन्हाला भडकलेलं तुम्ही कधी पाहिलंय? नाही ना..पण,अलीकडे सोनाचा पारा असा काही चढला की, ती एका पत्रकारावर चांगलीच भडकली़ आता सोनाला इतकं भडकायला काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल़ तर कारणही तसंच आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये सोनाचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेने सोना जाम वैतागलीय.  ‘त्या’ पत्रकाराने नेमका हा प्रश्न सोनाला विचारला आणि मग काय, तिचा पारा चढला़ माझ्या साखरपुड्याची बातमी खोटी आहे़ माझ्या हातात दिसतेय का अंगठी?

खोट्या बातम्या पसरवणे थांबवा. या अशा खोट्या बातम्यांनी माझा मित्रपरिवार, कुटुंबीय यांना मन:स्ताप झालेला मी सहन करणार नाही, असा दमच तिने भरला़

Web Title: 'What ring is in my hand?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.