​‘दंगल’च्या दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:39 IST2017-02-05T10:09:58+5:302017-02-05T15:39:58+5:30

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम करणाºया ‘दंगल’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारी आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. दंगल हा ...

What is the next directorial venture of 'Dangle'? | ​‘दंगल’च्या दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता?

​‘दंगल’च्या दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता?

लिवूडमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम करणाºया ‘दंगल’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारी आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. दंगल हा बायोपिक असल्याने त्याचा आगामी चित्रपटही एखाद्या व्यक्तीवर आधारित असेल असा विचार जर तुम्ही करीत असाल तर तो चुकीचा ठरू शकतो. यामागचे कारणही तसेच आहे. ‘मी कोणत्याही प्रकारचे चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे’, असे नितेश तिवारी याने सांगितल्याने त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘दंगल’ या चित्रपटातून सर्वांचा विरोध स्वीकारून आपल्या मुलींना कुश्तीच्या अखाड्यात उतरविण्याचा धाडसी निर्णय घेणाºया महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता. हा चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ३८५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. नितेश तिवारी इतर विषयांवरही चित्रपट तयार करण्यास उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. नितेश तिवारी म्हणाला, मी प्रत्येक प्रकारच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यास तयार आहे. मला स्वत:ला एका साच्यात बंद करायचे नाही. मात्र कशी कथा आवडेल हे मात्र त्या कथेवर अवलंबून आहे, मी थ्रिलर किंवा हॉरर चित्रपट देखील तयार करू शकतो. 



नितेश तिवारी म्हणाला, मी स्वत:साठी कधीच स्क्रिप्ट तयार करीत नाही. मी सर्व स्तरातील प्रेक्षकांसाठी चित्रपट तयार करीत आहे, त्यांच्याप्रती माझी काही जबाबदारी आहे. मी एखादा विषय समजावून सांगण्यासाठी चित्रपट तयार करीत नाही. माझ्या चित्रपटातून लोकांसा एक संदेश मिळत असेल तर ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाचीच आहे. दंगल या चित्रपट चांगला तयार झाला आहे. याला आणखी चांगल्या पद्धतीने तयार करताच आले नसते. 

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी सध्या एका स्क्रिप्टवर काम करीत असून त्याचा आगामी चित्रपट थ्रिलर असू शकतो असा अंदाज लावण्यात येत आहे. याचा उल्लेख सध्या तो टाळत असला तर त्याच्या बोलण्यातून तो काय करण्याचा विचार करीत असावा याचा अंदाज लावता येतो असे जाणकारांचे मत आहे. बॉलिवूडमध्ये आपण जे करणार आहोत त्याची जाहीर चर्चा न करता त्याचा पुसटसा उल्लेख करण्याची ही जुणी पद्धती आहे असेही सांगण्यात येते. 

Web Title: What is the next directorial venture of 'Dangle'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.