​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय बोलली ‘ही’ अभिनेत्री की मिळू लागल्या धमक्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 14:18 IST2018-04-10T08:48:16+5:302018-04-10T14:18:16+5:30

सुमारे २० वर्षांपूर्वी आलेला ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. होय, याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काळवीट शिकार ...

What is the meaning of the actress that gets the support of Salman Khan? | ​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय बोलली ‘ही’ अभिनेत्री की मिळू लागल्या धमक्या?

​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय बोलली ‘ही’ अभिनेत्री की मिळू लागल्या धमक्या?

मारे २० वर्षांपूर्वी आलेला ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. होय, याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काळवीट शिकार प्रकरण सलमान खानला भारी पडतेय. गत ५ तारखेला याप्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. यानंतर जामीन मिळेपर्यंतच्या दोन रात्री सलमानला तुुरूंगात घालवाव्या लागल्यात. सलमानच्या याच काळवीट शिकार प्रकरणी टीव्हीवर सुरू असलेल्या डिबेटमुळे आता या चित्रपटातील सलमानची को-स्टार कुनिका सदानंद अडचणीत आली आहे. होय, कुनिकाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. कुनिकाने नुकतीच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

  काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई समाजाविरोधातील कुनिकाच्या एका बयानंतर धमक्यांचे हे सत्र सुरू झाले. कुनिकाने याबद्दल माहिती देताना सांगितले की, एका टीव्ही वाहिनीवर काळवीट शिकारप्रकरणी चर्चा सुरू होती. मी या चर्चेत सामील झाले होते. यात मी सलमानची बाजू घेतली होती. सलमानला शिक्षा देण्याऐवजी बिश्नोई समाजाने त्याला एक उदाहरण म्हणून घ्यायला हवे. त्याच्या जामीनाला विरोध करण्याऐवजी त्याच्याच माध्यमातून आपल्या समाजासाठी, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करून घेतले पाहिजे. बिश्नोई समाज स्वत: शिकार करतो. एका मांसाहारी समाजात शाकाहारी लोक राहतात, हे अगदी त्याचप्रमाणे आहे, असे मी या चर्चेदरम्यान म्हणाले होते. यानंतर मला संतोष बिश्नोई नामक व्यक्तीचे धमकीचे फोन यायला लागले. माफी माग नाहीतर परिणाम भोग, असे तो मला म्हणाला. मी त्याची गोष्ट मानत माफी मागितली. पण यानंतरही धमकींचे फोन थांबले नाहीत. फेसबुकवरही मला धमक्या मिळू लागल्या. यानंतर मी पुन्हा एकदा माफी मागणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. पण याऊपरही मला धमक्या मिळत आहेत, असे ती म्हणाली. याप्रकरणी कुनिकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कळतेय.  

ALSO READ : ​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत नाही, पण सलमान चुकतो तेव्हा त्याचा बोभाटा होतो...!!

Web Title: What is the meaning of the actress that gets the support of Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.