WHAT?? ​‘अ जेंटलमॅन’मधून कापला जाणार जॅकलिन फर्नांडिसचा सेक्सी पोल डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:00 IST2017-08-11T10:26:55+5:302017-08-11T16:00:46+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस यांच्या ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटातील ‘चंद्रलेखा’ हे गाणे अलीकडेच रिलीज झाले. या गाण्यातील जॅकलिनच्या सेक्सी पोल डान्सची एक झलक तुम्ही पाहिली असेलच. जॅकलिनच्या या सेक्सी पोल डान्सला घेऊनच एक बातमी आहे.

WHAT ?? Jacqueline Fernandez's sexy pole dance cut in 'A Gentleman'! | WHAT?? ​‘अ जेंटलमॅन’मधून कापला जाणार जॅकलिन फर्नांडिसचा सेक्सी पोल डान्स!

WHAT?? ​‘अ जेंटलमॅन’मधून कापला जाणार जॅकलिन फर्नांडिसचा सेक्सी पोल डान्स!

द्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस यांच्या ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटातील ‘चंद्रलेखा’ हे गाणे अलीकडेच रिलीज झाले. या गाण्यातील जॅकलिनच्या सेक्सी पोल डान्सची एक झलक तुम्ही पाहिली असेलच. जॅकलिनच्या या सेक्सी पोल डान्सला घेऊनच एक बातमी आहे.   ती सुद्धा लाखो चाहत्यांचे मन तोडणारी. होय, ‘अ जेंटलमॅन’ रिलीज होणार, त्यातील ‘चंद्रलेखा’ हे गाणेही कायम असणार. पण यात  जॅकलिनचा सेक्सी पोल डान्स मात्र दिसणार नाही. होय, या पोल डान्सचा काही भाग गाण्यातून गाळण्यात येणार आहे. (अर्थात ‘आक्षेपार्ह’ श्रेणीत मोडणारा तेवढाच भाग गाळण्यात येणार)‘अ जेंटलमॅन’च्या मेकर्सनी हा मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय. सेन्सॉर बोर्डाकडून कुठलीही आडकाठी येऊ नये, म्हणून मेकर्सनी हा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. मेकर्सला हा चित्रपट एकदम कौटुंबिक चित्रपट असावा असे वाटतेय. जेणेकरून प्रेक्षकांना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट  पाहता येईल. त्यामुळेच  सेन्सॉर बोर्डाकडे जाण्याआधीच चित्रपट सेन्सॉर करण्याचे मेकर्सनी ठरवले आहे.
 


खरे तर, खास या चित्रपटासाठी जॅकलिन पोल डान्स शिकली होती. त्यासाठी तिने बराच घाम गाळला होता. ‘चंद्रलेखा’ शूट झाले तेव्हा एखादा प्रोफेशनल पोल डान्सरला लाजवेल, असा डान्स जॅकलिनने केला होता. पण आता जॅकची ही सगळी मेहनत पाण्यात गेली, असेच म्हणायचे. पण म्हणतात ना,कुछ पाने के लिऐ, कुछ खोना पडता है... कदाचित ‘अ जेंटलमॅन’बद्दलही असेच काही असावे. असे नसते तर मेकर्सनी चित्रपटाचा प्लस पॉर्इंट असलेल्या जॅकच्या सेक्सी पोल डान्सला कात्री का लावली असती? दिग्दशर््क राज आणि डीके यांचा हा चित्रपट येत्या २५ आॅगस्टला रिलीज होतो आहे.  

Web Title: WHAT ?? Jacqueline Fernandez's sexy pole dance cut in 'A Gentleman'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.