काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:00 PM2022-02-28T14:00:00+5:302022-02-28T14:00:00+5:30

Priyanka chopras baby: सरोगसीद्वारे प्रियांकाने मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. यामध्येच तिच्या बाळाच्या नावाचीही चर्चा होऊ लागली आहे.

what is priyanka chopras baby name madhu chopra said about babys name | काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा

काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). देसी गर्लनंतर क्वांटिको गर्ल अशी ओळख निर्माण करणारी प्रियांका तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे कायम चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आई झाली आहे. सरोगसीद्वारे प्रियांकाने मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. यामध्येच तिच्या बाळाच्या नावाचीही चर्चा होऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रियांकाच्या बाळाच्या रुमची झलक दाखवण्यात आली होती. तेव्हापासून नेटकऱ्यांना प्रियांकाच्या लेकीची एक झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे. प्रियांका तिच्या बाळाचा फर्स्ट लूक कधी चाहत्यांना दाखवणार हा एकच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यामध्येच आता तिच्या बाळाचं नाव काय असेल हा नवा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे या बाळाच्या नावाचा खुलासा प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मधु चोप्रा यांच्या कॉस्मेटिक क्लिनिकला १४ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी त्यांच्या क्लिनिकविषयी, प्रियांका आणि तिच्या बाळाविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात प्रियांकाच्या बाळाचं नाव काय असेल हेदेखील सांगितलं.

"मी झाल्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. माझा प्रत्येक दिवस आनंदात जातोय.  प्रियांकाच्या बाळाचं नाव अद्याप तरी ठेवलेलं नाही. पण, पंडितजी सांगतील त्यावेळी बाळाचं नाव ठेवण्यात येईल", असं मधु चोप्रा म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निक आणि प्रियांका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्ही पालक झाल्याचं जाहीर केलं. सोबतच सरोगसीद्वारे आम्ही आई-वडील झालो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हापासून प्रियांकाच्या बाळाला पाहण्यासाठी, त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

Web Title: what is priyanka chopras baby name madhu chopra said about babys name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.