​काय म्हणता? नर्गिस फखरी लग्नापूर्वीच प्रेग्नंट??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:52 IST2017-08-26T10:22:29+5:302017-08-26T15:52:29+5:30

अभिनेत्री नर्गिस फखरी ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक़ तिची स्टाईल आणि तिची पर्सनॅलिटी सगळेच हटके आहे. पण सध्या बातमी ...

What do you say? Nargis Fakhri pregnant before marriage ?? | ​काय म्हणता? नर्गिस फखरी लग्नापूर्वीच प्रेग्नंट??

​काय म्हणता? नर्गिस फखरी लग्नापूर्वीच प्रेग्नंट??

िनेत्री नर्गिस फखरी ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक़ तिची स्टाईल आणि तिची पर्सनॅलिटी सगळेच हटके आहे. पण सध्या बातमी आहे ती नर्गिस प्रेग्नंट असल्याची. काय? दचकलात? खरे तर, दचकणे स्वाभाविक आहे. लग्नापूर्वीच नर्गिस  प्रेग्नंट आहे, म्हटल्यावर दचकायला होणारच.
आता नर्गिस ही प्रेग्नंट असल्याची बातमी कशी फुटली(?) ते आम्ही तुम्हाला सांगतो. अलीकडे नर्गिस विमानतळावर दिसली. पण यावेळी नेहमीप्रमाणे विमानतळावर ती आपला चेहरा लपवताना दिसली. मीडियाचे कॅमेरे तिला क्लिक करण्यासाठी सरसावले. पण नर्गिसने दोन्ही हातांनी चेहरा लपवून घेतला. याचवेळी अचानक फोटोग्राफर्सचे लक्ष नर्गिसच्या बम्पकडे गेले. नर्गिसच्या पोटाचा घेर वाढलेला होता. फोटोत बम्प स्पष्ट दिसतेय म्हटल्यावर तर नर्गिस प्रेग्नंट आहे, असा थेट निष्कर्ष काढण्यात आला आणि याचीच बातमी झाली.



ALSO READ : नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??

आता उरला प्रश्न तो हा की, खरोखरीत नर्गिस लग्नाआधी प्रेग्नंट आहे वा नाही? तर नाही, असे काहीही नाही. नर्गिसचे वजन सध्या बरेच वाढलेले आहे आणि तिचा बम्प हा त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे नर्गिस प्रेग्नंट आहे, या बातमीने केवळ सगळ्यांचे मनोरंजन केले इतकेच. या बातमीवर स्वत: नर्गिसनेही मज्जा घेतली. शुक्रवारी रात्री उशीरा, स्वत:चा बम्पचा फोटो शेअर करत, त्यावर ब्रेकिंग न्यूज असे लिहून नर्गिसने ही बातमी चांगलीच एन्जॉय केली. जोक समजून या बातमीची स्वत: टर उडवताना ती दिसली.
काही महिन्यांपूर्वी नर्गिस अशाच एका बातमीने चर्चेत आली होती. बॉयफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस   अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्यांची बरीच चर्चा झाली होती. अर्थात त्याहीवेळी नर्गिसने  या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले होते.

Web Title: What do you say? Nargis Fakhri pregnant before marriage ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.