​दीपिकाच्या ‘पद्मावती’मध्ये काय करतेय ऐश्वर्या? ऐश-डिप्पीचे होणार ‘डान्स वॉर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:00 IST2016-12-09T14:00:20+5:302016-12-09T14:00:20+5:30

दीपिका पदुकोन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पद्मावती’ची शूटींग सुरू आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या सिनेमात तिला टक्कर देण्यासाठी आता ...

What do Aishwarya do in Deepika Padmavati? Ash-Dippi will be seen in 'Dance War' | ​दीपिकाच्या ‘पद्मावती’मध्ये काय करतेय ऐश्वर्या? ऐश-डिप्पीचे होणार ‘डान्स वॉर’

​दीपिकाच्या ‘पद्मावती’मध्ये काय करतेय ऐश्वर्या? ऐश-डिप्पीचे होणार ‘डान्स वॉर’

पिका पदुकोन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पद्मावती’ची शूटींग सुरू आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या सिनेमात तिला टक्कर देण्यासाठी आता आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणाी नसून दस्तुरखुद्द ऐश्वर्या राय-बच्चन आहे.

ऐशच्या चाहत्यांना खुश करणाऱ्या बातमीनुसार, ‘पद्मावती’मध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या रुपात छोटीशी भूमिका साकारणार आहे. एवढेच नव्हे तर भंसाळींनी तिच्यावर एक गाणे शूट करण्याचीसुद्धा तयारी केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि भंसाळी ऐकमेकांसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. म्हणून तर त्यांनी ‘पद्मावती’मध्ये खास तिच्यासाठी एक भूमिका लिहिली आहे. ऐश आहे म्हटल्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स असणाऱ्या गाण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. त्यानुसार लवकरच मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये या गाण्याची रिहर्सल सुरू होतेय.


द म्युझ :संयल लीला भंसाळी आणि ऐश्वर्या राय बच्चन

याचा अर्थ दीपिका-ऐशची डान्स जुगलबंदी पाहायला मिळेल का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण ‘देवदास’मधील माधुरी-ऐश किंवा ‘बाजीराव मस्तानी’तील दीपिका-प्रियांकासारखे नृत्यद्वंद्व पुन्हा साकारण्याची त्यांची इच्छा नाही. यावेळी ते काही तरी हटके करणार आहेत, अशी माहिती मिळतेय.

भंसाळी आणि ऐशने यापूर्वी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ या तीन सिनेमांत एकत्र काम केले आहे. ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रोमोशन वेळी भंसाळींनी म्हटले होते की, ‘ऐश्वर्या माझी फेव्हरेट अ‍ॅक्ट्रेस आहे.’ चित्रपटाच्या यशानंतर ऐश्वर्याने त्याच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. मीडिया फोटोग्राफर्ससमोर ऐशने भंसाळीच्या गालावर किस करून त्यांचेबद्दलचे ‘प्रेम’ व्यक्त केले होते.

‘पद्मावती’ ही एक ऐतिहासिक प्रेमकहाणी असून यामध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे शाहिद कपूर राजा रतन सिंगची भूमिका साकारत तर भंसाळीचा फेव्हरेट रणवीर सिंग मुघल सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार. ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’नंतर भंसाळी-दीपिका-रणवीर हे त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येतेय.


लकी डिरेक्टर : संजय लीला भंसाळी आणि दीपिका पदुकोन

चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून शाहिदने आपल्या शूटिंगच्या पूर्वी एक फोटो अपलोड केला आहे. त्याने या फोटवर ‘पद्मावती’च्या शूटिंगचा पहिला दिवस, मला शुभेच्छा द्या असे कॅप्शन दिले आहे.

हा चित्रपट म्हणजे भन्साळींचं स्वप्न. चित्रपटाची शूटिंग केव्हा सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. पण, जेव्हा दीपिका पादुकोण पद्मावतीच्या लूकमध्ये सेटवर पोहोचली तेव्हा तिला पाहून त्याला पहिल्यांदा वाटलं की, खरंच ‘पद्मावती’ ची शूटिंग सुरू झालीय ते.

Web Title: What do Aishwarya do in Deepika Padmavati? Ash-Dippi will be seen in 'Dance War'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.