बॉबी देओलला स्टार बनविण्याच्या नादात सलमान खानने हे काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 19:28 IST2018-05-25T13:58:49+5:302018-05-25T19:28:49+5:30
सुपरस्टार सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहºयांना लॉन्च केले आहे. त्याचबरोबर बुडणाºयांना सावरलेदेखील आहे. सध्या तो अभिनेता बॉबी देओलचे ...

बॉबी देओलला स्टार बनविण्याच्या नादात सलमान खानने हे काय केले?
स परस्टार सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहºयांना लॉन्च केले आहे. त्याचबरोबर बुडणाºयांना सावरलेदेखील आहे. सध्या तो अभिनेता बॉबी देओलचे करिअर सावरण्यासाठी पुढे आला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या ‘रेस-३’मध्ये बॉबीला संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये बॉबी अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. ट्रेलरमधील बॉबीचा अंदाज चाहत्यांकडून तुफान पसंत केला जात आहे. वृत्तानुसार, बॉबी सलमानच्या ‘दबंग-३’मध्येही प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त सलमानने बॉबीला एक सोलो चित्रपटही आॅफर केला आहे. वास्तविक हा चित्रपट अगोदर सलमानला देण्यात आला होता. मात्र सलमानने त्यासाठी बॉबीचे नाव पुढे केले आहे.
जेव्हा सलमानने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याने चित्रपटातील भूमिकेसाठी बॉबी फिट असल्याचे म्हटले. जेव्हा सलमानने ही बाब बॉबीला सांगितली तेव्हा त्याने त्यास नकार दिला. बॉबीच्या मते, त्याने आताच कमबॅक केले आहे. अशात मला फक्त मल्टिस्टारर चित्रपटच करायचे आहेत. त्याला नाही वाटत की, आपल्यावर कुठल्याही प्रकारचे प्रेशर निर्माण होवो. बॉबीच्या या उत्तरानंतरही सलमानने त्याला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, बॉबीकडे ‘रेस-३’ व्यतिरिक्त ‘हाउसफुल-४’ आणि ‘यमला पगला दीवाना’ हे मोठे प्रोजेक्ट आहेत. बॉबीने नुुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा सलमानचे करिअर डगमगले होते तेव्हा त्याने सनी देओल आणि संजय दत्तचा आधार घेतला होता. त्यामुळे मी आता मामूला म्हटले की, मला तुझा आधार घ्यायचा आहे. मला चित्रपटांमध्ये काम दे. मात्र बॉबीने एकदा केलेल्या विनंतीला सलमान असा काही धावून आला की, त्याच्याकडे चित्रपटांची लाइन लागली आहे. मात्र एवढ्यातच बॉबीला सोलो हीरोवाले चित्रपट करायचे नाहीत. जर बॉबीने या चित्रपटासाठी होकार दिला तर सलमानच या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार आहे.