​काय?? कॅटरिनाला लगीनघाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 19:48 IST2016-06-13T14:18:06+5:302016-06-13T19:48:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. अर्थात याचदरम्यान काही जणांच्या लग्नाच्या गोड बातम्याही आल्याच. एका लोकप्रीय मॅगझीनने ...

What ?? Catalina? | ​काय?? कॅटरिनाला लगीनघाई?

​काय?? कॅटरिनाला लगीनघाई?

ल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. अर्थात याचदरम्यान काही जणांच्या लग्नाच्या गोड बातम्याही आल्याच. एका लोकप्रीय मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर हळूहळू सावरत असलेली कॅटरिना कैफ ही सुद्धा लग्नाच्या तयारीत आहे. होय, लग्न करण्याचा निर्णय कॅटरिनाने घेतलायं म्हणे..रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कॅटरिना सावरलेली दिसतेयं. पण कॅटच्या मॉमला मात्र कॅटरिनाने आता भविष्याचा विचार करावा, असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. त्यामुळेच तिने कॅटरिनासाठी वर संशोधन सुरु केले आहे. कॅटरिनास लवकर एक अनुरूप जोडीदार मिळावा, असे मॉमला वाटतेय आणि त्यांनी ते मनावरही घेतले आहे. म्हणजे कॅटच्या घरी लवकरच वेडिंग बेल वाजणार..आता रणबीर यावर काय बोलतो, ते ऐकणे इंटरेस्टिंग ठरेल..होय ना??

  

Web Title: What ?? Catalina?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.