​काय?? अनुष्का शर्माने ‘नुश’च्या डिझाईनसाठी केली चोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 15:01 IST2017-10-11T09:31:25+5:302017-10-11T15:01:25+5:30

अनुष्का शर्मा डिझाईनर बनल्याची बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. नुकताच अनुष्काने तिचा ‘नुश’ हा क्लोथिंग ब्रांड लॉन्च केला. ...

What ?? Anushka Sharma's Kishi theft for 'Kunsh' design? | ​काय?? अनुष्का शर्माने ‘नुश’च्या डिझाईनसाठी केली चोरी?

​काय?? अनुष्का शर्माने ‘नुश’च्या डिझाईनसाठी केली चोरी?

ुष्का शर्मा डिझाईनर बनल्याची बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. नुकताच अनुष्काने तिचा ‘नुश’ हा क्लोथिंग ब्रांड लॉन्च केला. अगदी वाजत-गाजत, अनुष्काने सोशल मीडियावर या ब्रांडचे प्रमोशन केले होते. पण अनुष्काच्या या ‘नुश’ ब्रांडबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीय. होय, लोकप्रीय होण्याआधीच अनुष्काचा हा ब्रांड वादात सापडला आहे. कुठला वाद आणि काय, कळले नाही ना? तर पुढे वाचा.
अनुष्काच्या ‘नुश’ ब्रांड म्हणे चोरीचा आहे. होय, ‘नुश’ वर कपड्यांचे डिझाईन्स कॉपी केल्याचा आरोप ठेवला जात आहे. ‘नुश’ने लॉन्च केलेले कपड्यांचे सगळे डिझाईन्स एका चीनी संकेतस्थळावरून कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. अर्थात ‘नुश’च्या प्रवक्त्याने हा आरोप फेटाळला आहे. ‘आमच्या काही डिझाईन्समध्ये आणि प्रख्यात फॅशन ट्रेंडमध्ये काही साम्य आढळले आहे. पण आम्ही सरसकट कॉपी केली असे म्हणता येणार नाही. ज्या डिझाईन्समध्ये साम्य आहे. त्या ‘नुश’ च्या कलेक्शनमधून आम्ही गाळून टाकणार आहोत’, असे या प्रवक्त्याने सांगितले.
एकंदर काय तर ‘नुश’मुळे अनुष्काची प्रतीमा डागाळली जात आहे. खरे तर अनुष्काचा ‘नुश’च्या उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नाही. केवळ डिझाईन्सबदद्ल ती सल्ले देत होती. पण तरिही अनुष्काचा ब्रांड म्हटल्यावर आरोपही तिच्यावरच होणार. आता या सगळ्या आरोपांना अनुष्का काय उत्तर देणार, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

ALSO READ : यशस्वी अभिनेत्री, यशस्वी निर्माती आणि आता डिझाईनर बनली अनुष्का शर्मा!!

गेल्या वर्षभरापासून अनुष्का ‘नुश’ ब्रांड लॉन्च करण्याच्या तयारीत गुंतली होती. ‘नुश’ हा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’नंतरचा माझा दुसरा प्रयत्न आहे. एक तरूण मुलगी या नात्याने माझ्या फॅशन सेन्सनुसार शॉपिंग करायची झाल्यास सगळे काही एका छताखाली मिळावे, असे मला वाटते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी अनेक स्टोर्सचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे सगळे काही एका छताखाली मिळावे. प्रत्येक ड्रेस स्टाईल एकत्र आणणे हा ‘नुश’चा उद्देश  असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: What ?? Anushka Sharma's Kishi theft for 'Kunsh' design?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.