Wedding Bells:दीपिका -रणवीर 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 16:12 IST2018-06-21T10:42:53+5:302018-06-21T16:12:53+5:30
आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री दीपिका पादुकोणच्याही लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या लग्नाचा ...
.jpg)
Wedding Bells:दीपिका -रणवीर 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात?
आ ी लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री दीपिका पादुकोणच्याही लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे.गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह या लव्हबर्ड्सचं चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु होतं. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारी जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. खुद्द रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणाने भाष्य केलं नाही. मात्र वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे दोघं लग्नबंधनात अडकतील,असंच अनेकांना वाटत आहे.आता सगळ्यांच्या मनातील ही गोष्ट प्रत्यक्षात घडणार आहे. रणवीर आणि दीपिका येत्या १० नोव्हेंबरला रेशीमगाठीत अडकणार आहेत. प्रसिद्द मासिक 'फिल्मफेअर’ ने याबाबत वृत्त दिलंय. लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने वेळ घेतलाय. आता दोघांच्या बिझी शेड्युअलचा विचार करता १० नोव्हेंबर दोघांसाठी सोयीची तारीख आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा लग्नसोहळा पार पडेल. त्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत जंगी रिसेप्शन असेल.
cnxoldfiles/a>विशेष म्हणजे लग्नाच्या तयारीत तसू भरही गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिदच देण्यात आली आहे.दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्नादरम्यान हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते. आता दीपिका आणि रणवीर कधी त्यांच्या चाहत्यांना ही गुड न्युज देतात याच्याच प्रतिक्षेत चाहते दिसत आहेत.