"We were on a break!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 22:01 IST2016-04-01T03:43:30+5:302016-04-11T22:01:57+5:30

 अनुष्का व विराटच्या बे्रकअपच्या बातम्या चर्चिल्या जात असतानाच, हे ब्रेकअप झालेलेच नाही, तर त्यांनी ब्रेक घेतला होता,अशी एक बातमी ...

"We were on a break!" | "We were on a break!"

"We were on a break!"

 
नुष्का व विराटच्या बे्रकअपच्या बातम्या चर्चिल्या जात असतानाच, हे ब्रेकअप झालेलेच नाही, तर त्यांनी ब्रेक घेतला होता,अशी एक बातमी समोर आली आहे आणि पाठोपाठ अनुष्का व विराट मोठ्या ब्रेकनंतर डिनर डेटवर दिसले. अर्थात यानंतरही या दोघांमध्ये नेमके काय, सुरु आहे, हे काही कळायला मार्ग नव्हता. कारण अनुष्का वा विराट यापैकी कुणीही बोलायला तयार नव्हते. अनुष्का व विराटचे खरेच ब्रेकअप झाले की त्यांनी त्यांनी ब्रेक घेतला होता, हा प्रश्न कायम होता.  पण आता बºयाच दिवस मौन बाळगल्यानंतर अखेर विराटने तोंड उघडलेयं आणि सगळं काही स्पष्ट केलयं. तेही आगळ्यावेगळ्या पद्धतीने. विराट नुकताच एक टीशर्ट घालून दिसला. आता तुम्ही म्हणाल, यात काय नवल. तर पुढे ऐका. या टीशर्टवर लिहिलेले होते, "We were on a break!". आता प्रकाश पडला ना!! म्हणजेच, अनुष्का व विराटचे ब्रेकअप झालेलेच नव्हते तर त्यांनी बे्रक घेतला होता...कळले??? 



.........................................
​विराट-अनुष्काचे ब्रेकअप नाहीच!!!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासंदर्भात एक आश्चर्याचा धक्का देणारा खुलासा करण्यात आला आहे. होय, अनुष्का व विराटच्या बे्रकअपच्या बातम्या चर्चिल्या जात असतानाच, हे ब्रेकअप झालेलेच नाही, अशी एक बातमी समोर आली आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, अनुष्का व विराटचे ब्रेकअप झालेले नाही तर दोघांनीही परस्परांपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. दोघांची अतिव्यस्तता हे त्यामागचे कारण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का सध्या सलमानसोबच्या ‘सुल्तान’मध्ये बिझी आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी दोन प्रोजेक्ट आहे. तिकडे विराटही वर्ल्ड कप टी-२०मध्ये बिझी आहे. अशास्थितीत दोघांनाही परस्परांसाठी वेळ काढणे अशक्य आहे. त्यामुळे दोघांनीही काही काळ एकमेकांपासून ब्रेक घेतला आहे. दोघांमध्येही सगळे आॅल वेल असल्याचे संकेत अलीकडेच मिळाले होते. ताज्या वर्ल्डकप टी-२०मध्ये मॅन आॅफ दी मॅच जिंकल्यानंतर अनुष्काने विराटला मॅसेज पाठवून अभिनंदन केले होते. यानंतर हे दोघेही बराच वेळ फोनवरून बोलल्याचीही खबर आहे.

Web Title: "We were on a break!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.