तापसी पन्नू दीपिकाच्या वाटेवर...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 10:44 IST2016-03-09T17:44:27+5:302016-03-09T10:44:27+5:30
बेबी अॅक्ट्रेस तापसी पन्नू हिचे करिअर सध्या चांगलेच मार्गी लागले आहे. अनेक मोठे प्रोजेक्ट तिच्या हातात आहे. यातलाच एक ...

तापसी पन्नू दीपिकाच्या वाटेवर...?
ब बी अॅक्ट्रेस तापसी पन्नू हिचे करिअर सध्या चांगलेच मार्गी लागले आहे. अनेक मोठे प्रोजेक्ट तिच्या हातात आहे. यातलाच एक म्हणजे सुजीत सरकार निर्मित ‘ईव’.(तात्पुरते नाव. कारण हे या चित्रपटाचे नाव नाही, असे खुद्द बिग बी यांनी जाहिर केले आहे.) ‘ईव’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेष म्हणजे दीपिका पदुकोण सोडली तर ‘पीकू’ या चित्रपटाचीच अख्खी टीम ‘ईव’साठी खपते आहे. सूजीत सरकार यांनी ‘पीकू’ साकारला होता. यात अमिताभ बच्चन यांनी ७० वर्षांच्या वडिलांची तर दीपिकाने त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. हेच अमिताभ आता तापसीसोबत दिसणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पिकू’ प्रमाणेच ‘ईव’ हा सुद्धा महिलाप्रधान चित्रपट असणार आहे. ‘पिकू’ने दीपिकाला मोठी वाह, वाह मिळवून दिली होती. अवार्ड घेऊन दीपू थकली होती पण अवार्ड देणारे थकले नव्हते. आता हीच संधी तापसीला आहे म्हणायचे...आता बघू तापसी दीपिकाच्या वाटेने किती आणि कशी चालते ते?