watch video : सलमान व जॉनला डावलून, करिना कपूरने दिली शाहिद कपूरवरच्या प्रेमाची कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 10:09 IST2017-03-30T04:39:04+5:302017-03-30T10:09:04+5:30
शाहिद कपूर व करिना कपूर यांची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या चर्चित लव्हस्टोरींमध्ये गणली जाते. करिना व शाहिद दोघेही आपआपल्या पर्सनल लाईफमध्ये आनंदी असताना, आम्हाला त्यांचा भूतकाळ आठवण्यामागचे कारण काय? तर एक व्हिडिओ.

watch video : सलमान व जॉनला डावलून, करिना कपूरने दिली शाहिद कपूरवरच्या प्रेमाची कबुली!
श हिद कपूर व करिना कपूर यांची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या चर्चित लव्हस्टोरींमध्ये गणली जाते. करिना व शाहिद दोघेही आपआपल्या पर्सनल लाईफमध्ये आनंदी असताना, आम्हाला त्यांचा भूतकाळ आठवण्यामागचे कारण काय? तर एक व्हिडिओ. होय, करिना कपूर व शाहिद कपूरचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. इंटरनेटच्या जगात कशालाही मरण नाही, असे म्हटले जाते. नेमके हे वेळोवेळी खरे होताना दिसतेय. आता या व्हिडिओचेच घ्या ना, हा व्हिडिओ म्हटला तर खूप जुना. पण कालपासून तो ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडिओत बेबोने सगळ्यांसमोर शाहिदवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आहे ना गंमत! हा व्हिडिओ आहे एका डान्स परफॉर्मन्सचा. या व्हिडिओत सलमान, जॉन व करिना स्टेजवर ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यावर एकत्र परफॉर्म करताहेत. याचदरम्यान सलमान व जॉन दोघेही करिना ‘मुझसे शादी करोगी...?’ अशी गळ घालतात. पण करिना त्यांच्यापासून स्वत:चा पिच्छा सोडवत शाहिद कपूरकडे धाव घेते आणि त्याला ‘तुझसे शादी करूंगी...’ म्हणते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही काय म्हणतोय, हे तुम्हाला आपसूक कळून येईल.
करिना व शाहिद यांची लव्हस्टोरी ऐन भरात असतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी शाहिद व करिना दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते. करिनाने तर तशी कबुलीही दिली होती. मी शाहिदशी लग्न करायला तयार आहे, इथपर्यंत ती बोलून गेली होती. अर्थात हे प्रेम या मुक्कामापर्यंत पोहोचण्याआधीच संपले. आता करिना व शाहिद दोघेही आपआपल्या आयुष्यात खुश आहेत.