Watch Video : लेडिज ‘टॉयलेट’मध्ये घुसला रणवीर सिंग; धक्के मारून काढले बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 09:45 IST2017-08-09T09:26:39+5:302017-08-10T09:45:14+5:30

रणवीर चक्क अभिनेत्रीच्या ‘टॉयलेट’मध्ये घुसला आहे. जेव्हा ही बाब त्या अभिनेत्रीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्याला धक्के मारून ‘टॉयलेट’च्या बाहेर काढले आहे.

Watch Video: Ranveer Singh enters Ladies' toilet; Pushing out! | Watch Video : लेडिज ‘टॉयलेट’मध्ये घुसला रणवीर सिंग; धक्के मारून काढले बाहेर!

Watch Video : लेडिज ‘टॉयलेट’मध्ये घुसला रणवीर सिंग; धक्के मारून काढले बाहेर!

ल्या हटके अंदाज आणि उचापतीसाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंग अशाच काहीशा उचापती करताना स्पॉट झाला आहे. यावेळेस तर त्याने उचापती करण्याची परिसीमाच गाठली आहे. होय, रणवीर चक्क अभिनेत्रीच्या ‘टॉयलेट’मध्ये घुसला आहे. जेव्हा ही बाब त्या अभिनेत्रीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्याला धक्के मारून ‘टॉयलेट’च्या बाहेर काढले आहे. याबाबतचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही रणवीरचा हा प्रताप बघू शकता. त्याचबरोबर व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या हेदेखील लक्षात येईल की, हा व्हिडीओ म्हणजे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. 

सध्या अक्षयकुमार आणि भूमी पेडनेकर स्टारर ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. सध्या अक्षय आणि भूमी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, रणवीरनेही प्रमोशनमध्ये भाग घेतला आहे. यासाठी रणवीरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यामध्ये तो अतिशय खोडकर अंदाजात बघावयास मिळत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणवीर भूमीच्या रूममधील ‘टॉयलेट’मध्ये जातो. जेव्हा भूमी रणवीरला बघते तेव्हा ती घाबरून जाते. रणवीरला याचा जाब विचारल्यानंतर त्याला धक्का मारून रूमच्या बाहेर काढते. 
 

सध्या अक्षयच्या या चित्रपटाचे केवळ रणवीरच नव्हे तर वरुण धवनही प्रमोशन करीत आहे. वरुणनेही प्रमोशनसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे, त्यावरून हा चित्रपट जबरदस्त हिट ठरेल असेच काहीसे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कितपत गल्ला जमवेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होत आहे. 
 

Web Title: Watch Video: Ranveer Singh enters Ladies' toilet; Pushing out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.