Watch Video : कॅटरिना कैफचे अश्रू सलमान खानला झाले असह्य; मग केले असे काही...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 19:59 IST2018-04-12T14:28:50+5:302018-04-12T19:59:00+5:30

सलमान आणि कॅटरिना यांचे जरी ब्रेकअप झाले असले तरी त्यांच्यातील मैत्रीपूर्र्ण नाते टिकून आहे. गेल्यावर्षी ते एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये पोहोचले असता हे दिसून आले.

Watch Video: Katrina Kaif's tears in Salman Khan is unbearable; Then something like that ...? | Watch Video : कॅटरिना कैफचे अश्रू सलमान खानला झाले असह्य; मग केले असे काही...?

Watch Video : कॅटरिना कैफचे अश्रू सलमान खानला झाले असह्य; मग केले असे काही...?

िनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचे जरी ब्रेकअप झाले असले तरी, हे दोघे त्यांच्यातील नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्यावर्षी या दोघांमध्ये पुन्हा पॅचअप तर झाले नाही ना? यावरून चांगलीच चर्चाही रंगली होती. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सलमान आणि कॅटचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये कॅटरिना कैफला रडताना बघून सलमान खूपच त्रस्त दिसत आहे. तिचे रडने थांबावे म्हणून तो सातत्याने तिच्या चेहºयावर हास्य फुलविण्याची धडपड करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

वास्तविक हा व्हिडीओ एका रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. काही काळापूर्वी कॅट आणि सलमान या शोमध्ये पोहोचले  होते. शोमध्ये एका स्पर्धकाने सलमानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील ‘तेरे नाम’ या गाण्यावर परफॉर्म केला होता. या स्पर्धकाचा परफॉर्मन्स बघून कॅट खूपच भावनिक झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र हे बघून सलमान खूपच परेशान झाल्याचे दिसून आले. पुढे तिला हसविण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करताना दिसतो. सलमान कॅटला लगेचच टिशू देतो. तसेच तिला हसविण्यासाठी डायलॉग विसरल्याची अ‍ॅक्टिंगही करतो. 
 

सलमान म्हणतो की, ‘उफ्फ कॅटरिना, रो मत, ठीक है, आय हेट टियर्स! वो कौन सा डायलॉग है?’ सलमानचे हे बोल ऐकून कॅट हसायला लागते. तसेच सलमान म्हणतो की, ‘अब कॅटरिना रोई है तो पहले वही बोलेंगी’ कॅट आणि सलमान त्यांच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचले होते. त्यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान कॅटला तिच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफमध्ये सहकार्य करताना दिसत आहे. 

Web Title: Watch Video: Katrina Kaif's tears in Salman Khan is unbearable; Then something like that ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.